एक्स्प्लोर
केजरीवालांनी जाळलेल्या रावणाच्या पुतळ्यात औरंगाबादच्या तरुणाचा फोटो
औरंगाबाद : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी दहन केलेल्या रावणाच्या पुतळ्यामधल्या एका डोक्यावरील चेहऱ्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दहा तोंडांपैकी एका चेहऱ्यावर औरंगाबादमधल्या एका सर्वसामान्य माणसाचा फोटो असल्याचं समोर आलं आहे.
हा चेहरा औरंगाबादमध्ये राहणाऱ्या फैज सय्यद यांचा असल्याची माहिती आहे. आयोजकांनी या पुतळ्यामध्ये पाकिस्तानातील अतिरेक्यांचे फोटो लावले होते. मग त्या पंक्तीमध्ये आपला फोटो का लावला असा सवाल फैज यांनी विचारला आहे.
फैज सय्यद हे औरंगाबादेत इस्लामिक रिसर्च सेंटर चालवतात. फैज यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला असून मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement