एक्स्प्लोर
पेट्रोल 17 पेसै तर डिझेलचे दर 16 पैशांनी स्वस्त
सध्या कच्च्या तेलाचे भाव 16 डॉलरने घसरुन 70 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. म्हणून इंधनाचे दर कमी होत आहेत.

बांगलादेशमध्ये पेट्रोलची किंमत 69.46 रुपये आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 17 पेसै तर डिझेलचे दर 16 पैशांनी कमी झाले आहे. मुंबईत पेट्रोल 83.40 रुपये आणि डिझेल 76.05 रुपयांना विकले जात आहे. नवी दिल्लीतही पेट्रोल स्वस्त झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोल 77.89 रुपये आणि डिझेल 72.58 रुपयांना विकले जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 18 ऑक्टोबरपासून घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने इंधनाचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती 16 डॉलरहून अधिक कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 86 डॉलर प्रतिबॅरल पर्यंत पोहचले होते. त्यावेळी पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली होती, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती. मात्र सध्या कच्च्या तेलाचे भाव 16 डॉलरने घसरुन 70 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. म्हणून इंधनाचे दर कमी होत आहेत. मात्र, येत्या काळात तेलाच्या किमतीत वाढ होण्याच शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीवर बंदी घातली आहे. इराणवरील बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते.
आणखी वाचा























