एक्स्प्लोर
पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्याची हातचलाखी, 100 रुपये घेऊन 20 रुपयांचं पेट्रोल
वर्धा : एकीकडे पेट्रोल एक रुपयांनी स्वस्त झाल्यामुळं आनंद होत असताना, वर्ध्यातल्या पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांना हातचलाखीनं ग्राहकांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. 100 रुपये देऊन केवळ 20 रुपयांचं पेट्रोल दिल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
वर्ध्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले किशोर देशमुख हे आज सकाळी वंजारी चौकातील आयुष पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यांनी कर्मचाऱ्यांला 100 रुपयांचं पेट्रोल भरायला सांगितलं. मात्र, कर्मचाऱ्यांन 100 रुपये घेत फक्त 20 रुपयांचंच पेट्रोल दुचाकीत भरलं. फसगत झाल्याचं देशमुख यांच्या लक्षात येताच दुचाकीतील पेट्रोल बाहेर काढलं. त्यावेळी पेट्रोल कमी असल्याचं दिसलं.
संबंधित बातमी : पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?
त्यानंतर देशमुख यांनी कमी पेट्रोल भरल्याबाबत जाब विचारला असता शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार काही देशमुख यांच्यासोबत झाला नव्हता. या पेट्रोल पंपावर वारंवार असेच प्रकार होत असल्याचा आरोप करत एका मागून एक फसवणूक झालेले परिसरातील लोक एकत्र आले आणि थोड्याच वेळात मोठी गर्दी जमा झाली. यावेळी पेट्रोलपंपचालकाविरोधात चांगलाचं संताप व्यक्त करण्यात आला. ग्राहकानं तक्रार बुक मागितलं असता तीन तासांनी त्यास तक्रार बुक देण्यात आलं. त्यामध्येही केवळ एकच तक्रार असल्याचं दिसलं. या पेट्रोलपंपावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.संबंधित बातमी : पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?
घटनास्थळी पोलीस आल्यानं प्रकरण चिघळण्यापासून रोखलं. तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं असून वजनमापक निरीक्षक यांच्याकडून वजनमाप आणि सील तपासण्यात आले. यात इंडिया ऑइलचे कार्म्चारुई हे सुद्धा पाहणी करणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement