एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मास्क दंड वसुली विरोधात असीम सरोदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

कोरोना दरम्यान मास्क बाबतच्या दंडावर अॅड. असीम सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दंड वसुलीमधील पारदर्शकता आणि वसुलीचा वापर यावर आक्षेप.

पंढरपूर : सध्या कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांकडून पोलीस, महापालिका, नगरपालिका मोठ्या प्रमाणात दंड वसूल करीत आहे. यामध्ये पारदर्शकता नसून याचा वापर आरोग्यासाठीच होणे गरजेचं असल्याचा आक्षेप घेत ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी मुंबई उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वास्तविक कोरोनाच्या काळात मास्क वापराने अत्यंत आवश्यक असले तरी जे व्यक्ती मास्क वापरात नाहीत त्यांच्याविरोधात पोलीस, महापालिका, नगरपालिका या सर्वांकडूनच दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, दंड केल्यावर त्या व्यक्तीला मास्क दिला जात नाही, असा आक्षेप सरोदे यांचा असून यातून नेमका किती दंड वसूल झाला याची माहिती पारदर्शकपणे समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जमा झालेल्या ह्या कोट्यवधींच्या निधीचा वापराबाबत पारदर्शकता नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन उपक्रमाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी पंढरपुरमध्ये दिली.

या याचिकेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणारी नेमकी अथोरिटी कोण? मागील वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड पैसा दंडाच्या स्वरूपात जमा झालेला आहे. महाराष्ट्रात पोलिसांनी किती दंड जमा केला. व महानगरपालिका, नगरपरिषदा यांनी किती दंड जमा केला त्याची माहिती न्यायालयात द्यावी. जर मास्क वापरला नाही म्हणून दंड केला तर मग मास्क न वापरणाऱ्याला त्वरित पोलिसांनी व इतर सरकारी संस्थांनी मास्क का दिले नाहीत? असा प्रश्न याचिकेतून विचारण्यात आला आहे.

दंडाच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा वापर लोकांच्या आरोग्यासाठीच करावा.. राज्यात जवळपास 15 लाख मूकबधीर असून या मास्कमुळे त्यांचा समाजाशी संवादच खुंटला आहे. अशावेळी सामाजिक न्याय विभागाने त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे मास्क बनवून ते त्यांना वितरित करावेत ज्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणाऱ्याला ते मूकबधीर आहेत हे समजू शकेल अशीही मागणी याचिकेत केली आहे. याशिवाय राज्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शासनाने मोफत चांगल्या दर्जाचे मास्क पुरवणे गरजेचे असून यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल असेही सरोदे यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget