एक्स्प्लोर
बाप्पाच्या भंडारा, महाप्रसादासाठीही आता परवानगीची अट

औरंगाबादः गणेशोत्सवानिमित्त भंडारा किंवा सार्वजनिक प्रसाद करायचा असेल तर त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने काढलेल्या नव्या फतव्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक गणेश मंडळं भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतात. गेल्या काही दिवसात अशा भंडाऱ्यांच्या कार्यक्रमातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. औरंगाबाद विभागासाठी हा निर्णय आहे. नोंदणीकृत गणेशमंडळांना तशी नोटीसही पाठवण्यात आली आहे. एकट्या औरंगाबाद शहरात 1 हजार 150 नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळ आहेत. तर नोंदणी न झालेल्या मंडळांची संख्या साडे चार हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या सर्व मंडळांना भंडारा करण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल. पण त्याची अंमलबजावणी करणं प्रत्यक्षात शक्य आहे का, हा प्रश्नच आहे.
Before You Go
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















