एक्स्प्लोर
मी संकटात असताना पवारांनी मला नेहमीच मदत केली : मनमोहन सिंह
‘पवार हे प्रभावी मंत्री होते. मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली. देशावर आलेल्या विविध संकटांवरही त्यांनी अत्यंत कुशलतेने मात केली आहे.’
औरंगाबाद : ‘पवार हे प्रभावी मंत्री होते. मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली. देशावर आलेल्या विविध संकटांवरही त्यांनी अत्यंत कुशलतेने मात केली आहे.’ अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं.
शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘दी ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाचं आज (शनिवार) प्रकाशन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थिती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे यावेळी मनमोहन सिंह यांनी शरद पवारांना कर्मयोगी ही पदवी बहाल केली. तसंच देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार समान भागीदार असल्याचे गौरवोद्वार मनमोहन सिंहांनी काढले आहेत.
‘मी संकटात असताना पवारांनी मला नेहमीच मदत केली’
‘देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार हे समान भागीदार आहेत. पवार यांचे देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये उत्तम योगदान आहे. 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मी अर्थमंत्री असताना शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. आर्थिक सुधारणांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या बजेटमध्ये कपात करण्यास मंजुरी देणारे ते एकमेव मंत्री होते. तसेच आर्थिक सुधारणांची भूमिका त्यांनी पुणे चेंबर ऑफ कॉमर्सच्या मंचावर देखील स्पष्ट केली आहे.’ असं म्हणत मनमोहन सिंह यांनी पवारांचे कौतुक केलं.
‘पवार हे प्रभावी मंत्री होते. मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली. देशावर आलेल्या विविध संकटांवरही त्यांनी अत्यंत कुशलतेने मात केली आहे.’ असंही मनमोहन सिंह यावेळी म्हणाले.
दरम्यान, पवारांनी देखील आपल्या राजकीय जीवनातील काही आठवणींना या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उजाळा दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement