तुम्ही कुत्रा पाळलाय? तर सावधान, कुत्र्यांमध्ये पसरलाय पार्वो आजार
जग कोरोना महामारीनं त्रस्त आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांवर सुद्धा बर्ड फ्लूमुळं संक्रात आली आहे आणि आता कुत्रे सुद्धा पार्वो या आजारानं बेजार झाले आहेत. औरंगाबादच्या पशू चिकीत्सालयात येणाऱ्या 100 कुत्र्यांपैकी जवळपास 60 कुत्र्यांमध्ये हा आजार वाढत दिसतोय.
औरंगाबाद : तुमच्या घरी जर कुत्रा आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सध्या कुत्रे एका आजारानं त्रासले आहेत. या आजारांच नाव आहे, पार्वो यातून कुत्र्यांचा तडफडून मृत्यू होत आहे. तर घरात लहान मुलं त्या कुत्र्यांसोबत खेळणारी असतील तर त्यांनाही या कुत्र्यांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जग कोरोना महामारीनं त्रस्त आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांवर सुद्धा बर्ड फ्लूमुळं संक्रात आली आहे, आणि आता कुत्रे सुद्धा पार्वो या आजारानं बेजार झाले आहेत. औरंगाबादच्या पशू चिकीत्सालयात येणाऱ्या 100 कुत्र्यांपैकी जवळपास 60 कुत्र्यांमध्ये हा आजार वाढत दिसतोय. त्यामुळ उपचारासाठी आता कुत्र्यांना दवाखान्याच आणलं जातंय.
काय आहे पार्वो?
एक व्हायरल आजार आहे, जो पसरतोय. यात कुत्र्यांना पिवळ्या रंगाची उलटी होते, तर पांढ-या रंगाची शौच होते. विष्ठेतून रक्तस्त्राव सुरु होतो. प्रचंड घाण वास येतो.. थेंबभर पाणी पाजले तरी कुत्र्याला वेदना होतात. हा विषाणू हृदयापर्यंत जातो आणि अनेक कुत्रे हृदय विकाराच्या झटक्यानं मरत आहे. सध्याचं हवामान या आजाराच्या वाढीसाठी पोषक ठरतोय, कुत्रे हवामान बदलतं तेव्हा स्ट्रेसमध्ये येतात आणि त्यातून त्यांनी रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की आजार बळावतो आहे, हा आजार होवू नये म्हणून लस सुद्दा आहे, मात्र लोकांना माहिती नसल्यानं रोग वाढत चालला आहे. त्यातून हा आजार वाढला की कुत्र्यांना दूर ठेवावं कारण, उलटी आणि शौचामधून विषाणू पसरतात आणि त्यात तुमचा कुत्रा घरात राहणारा असला तर लहानग्यांना सुद्दा यातून व्हायरल इंफेक्शन, डायरीया सारखे आजार होवू शकतात, असं डॉ अश्विनी राजेंद्र, जिल्हा पशूधन अधिकारी म्हणतात.
मात्र लहान मुलांना व्हायरल इंफेक्शन, डायरीया सारखे आजार होवू शकतात यावर पशु वैद्यकीय डॉक्टर यांच्या मध्ये मतांतर आहेत डॉक्टर दडके म्हणतात लहान मुलांना या आजाराचा कसलाही धोका नाही त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी भूतदया दाखवत रस्त्यावरची कुत्रीही दत्तक घेतली, त्यातून शहरात कुत्रे दत्तक घ्यायचीही मोहीमही सुरु आहे, मात्र कुत्रे दत्तक घेतांना नव्या लोकांना त्यांच्या आजाराविषयी माहिती नसते त्यातून आजार बळावत असल्याचं प्राण्यांचे डॉक्टर सांगताय. त्यामुळं कुत्र्यांचे लसीकरण योग्य वेळी करणंही गरजेचं असल्याचं डॉ अनिल भादेकर यांनी म्हटलं.
गेल्या महिनाभरात या आजारानं चांगलच थैमान घातलं आहे. वेळीच औषधोपचार किंवा त्याआधीही लसीकरण हे कुत्र्यांना या आजारापासून वाचवू शकते. या सोबतच कँनाईन डिस्टेंपर हा अर्धांगवायूचाही आजार वाढतांना दिसतोय, हा ही व्हायरल आजार आहे. त्यामुळं तुमच्या लाडक्या कुत्र्यांना सांभाळण्याची ही वेळ आहे, काळजी घ्या आणि आपल्या आवडत्या श्वानाचा जीव वाचवा आणि घरातील लहानग्यांचे आरोग्यही चांगल ठेवा. सध्या औरंगाबाद शहरात श्वानांमध्ये पार्वो व्हायरस (पार्वो) हा आजार झपाट्याने पसरत आहे.
काय आहे हा पार्वोव्हायरस?
कैनाईन पार्वोव्हायरस (CPV-b2) हा श्वानांचा उच्च मृत्यू दर असलेला अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. हा व्हायरस श्वानांच्या जठर,आतडे व हृदयाला इजा पोहचवतो.
कसा संक्रमित होतो?
पार्वो व्हायरस हा संक्रमित झालेल्या श्वानांच्या संपर्कात आल्यावर होतो. उदा. जेव्हा एक श्वान संक्रमित झालेल्या श्वानांच्या,त्याच्या मलाच्या संपर्कात येतो व संक्रमित झालेल्या श्वानाला व तो बसलेल्या जागेला चाटतो.
लक्षणं
•तीव्र रक्तरंजीत अतिसार व दुर्गंध असलेल्या विष्ठा. •उलट्या होणे •ताप येणे (104 to 106 °F) •भूक न लागणे •अशक्तपणा •मळमळ •औदासिन्य (डिप्रेशन) •सुस्तपणा
उपचार
CPV चे संक्रमण झाल्या नंतर ठोस उपचार नाहीत व तो नियंत्रित करण्यासाठी पशुवैद्य सहायक औषध-उपचार आणि व्यावहारिक उपायांची शिफारस करू शकतात ज्यामुळे आपल्या श्वानांची जिवंत राहण्याची शक्यता वाढू शकते यामध्ये •रूग्णालयात दाखल करणे •उलट्या बंद करणारी औषधे •अंतःस्रावी द्रव •प्रोबायोटिक्स •व्हिटॅमिन्स सामाविष्ट असू शकतात. उपचारासाठी आपल्या पशुवैद्याच्या सूचनांचे अनुसरण करा.
संक्रमण कसे टाळता येऊ शकते?
आपल्या श्वानाला पार्वो कॉन्ट्रॅक्ट करण्यापासून रोखण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे लसीकरण •प्रथम इंजेक्शन पिल्लू ६ ते ८ आठवड्याचे असतांना दिले जाते. •दुसरे इंजेक्शन पिल्लू १० ते १२ आठवड्याचे झाल्यावर. •तिसरे इंजेक्शन १४ ते १६ आठवड्याचे झाल्यावर. •बुस्टर एक वर्षानंतर •त्यानंतर प्रत्येक ३ वर्षांनंतर देण्यात येते.
अति महत्त्वाचे मुद्दे: १. माणसांना श्वानांपासून पार्वोची लागणं होतं नाही कारण श्वानं ही CPV-2b ह्या स्ट्रेन नी संक्रमित होतात जी zoonotic नसते. २. माणसांची स्ट्रेन B19 वेगळी आहे आणि दोघांमध्ये काहीही संबंध नाही. ३. श्वानांचं नियोजित वेळी न चुकता लसिकरण करणे. ४. जर आपल्या श्वानामध्ये पार्वोचे लक्षणं आढळल्यास त्वरित पशुवैद्याकडे घेऊन जाणे. स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न अतिशय घातक ठरू शकतो व श्वानाचा बळी जाऊ शकतो.