परभणी जिल्हा परिषदेने केला रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव
परभणीत (Parbhani) यंदा अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे करतांना (Reliance crop insurance) कडून नुकसानग्रस्त क्षेत्र व टक्केवारी कमी टाकलं आहे.
![परभणी जिल्हा परिषदेने केला रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव Parbhani Zilla Parishad decides to file a case against Reliance Company परभणी जिल्हा परिषदेने केला रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/02/a1b36dbfe478a71f52927f6deda2914c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : परभणी जिल्ह्यात (Parbhani) यंदा अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे करतांना रिलायन्स क्रॉप इन्शोरंसकडून (Reliance crop insurance) नुकसानग्रस्त क्षेत्र व टक्केवारी कमी टाकल्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळणार आहे. रिलायन्स कंपनी पावलोपावली करार भंग करत असल्यामुळे कंपनीवर करार भंग केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावा असा ठराव परभणी जिल्हा परिषदेने घेतला आहे.
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन व रिलायन्स विमा कंपनीचे अधिकारी तसेच कृषि विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पीक विम्याच्या नुकसानीसह पंचनाम्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. विशेषतः जिल्ह्यात 7 व 8 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्याप्रमाणेच जिल्ह्यात सरासरी 247 मि.मी. पाऊस झाला.सप्टेंबर महिन्यातील जिल्ह्यातील पावसाची सरासरी 167 मि.मी. एवढीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकर्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत पिक विमा नुकसान व पंचनामे या विषयाने या बैठकीत व्यापक चर्चा अपेक्षित होती. परंतु, रिलायन्स कंपनीचे अधिकारी बैठकीकडेच फिरकले नाहीत.
शिवाय पिक नुकसान तक्रारीची संपूर्ण माहिती NCIP (National Crop Insurance Portal) वर कंपनीने अपलोड करुन सर्वेक्षण हे तक्रारीच्या क्षेत्रानुसार ठरवणे आवश्यक असताना कंपनी असे करतांना दिसुन येत नाही. तक्रारीनुसार नुकसानग्रस्त क्षेत्र 25 % पेक्षा अधिक असतांना कंपनी प्रक्षेत्रावर वैयक्तीक सर्वे करत आहेत. यामुळे रिलायन्स कंपनी कडुन वारंवार कराराचा भंग केला जात असल्याने या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषद परभणीने घेतला आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर,उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्यासह कृषी व पशुसंवर्धन सभापती मिराताई टेंगसे, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, श्रीनिवास जोगदंड, श्रीनिवास मुंढे, सुभाष कदम,मीनाताई राऊत, शालीनीताई राऊत, इंदूमतीबाई घुगे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी गोविंद लांडगे, हेमचंद्र शिंदे यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)