एक्स्प्लोर

परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला, 300 जणांवर गुन्हा

पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेडमध्ये पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री 10 वाजता कीर्तन बंद केलं होतं. याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या निलंबनासाठी वारकऱ्यांनी मोर्चा काढला होता.

परभणी : परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला गेला आहे. पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री 10 वाजता कीर्तन बंद केलं होतं. याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या निलंबनासाठी वारकऱ्यांनी मोर्चा काढला होता. पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही विनापरवाना मोर्चा काढला, शिवाय पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यात खासदार संजय जाधव, रासप नेते रत्नाकर गुट्टे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांचाही समावेश आहे. गंगाखेड शहरातील इसाद रोड स्थित रामेश्वरनगर येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा सोहळा सुरू आहे. हा सोहळा पोलीस निरीक्षक सोहन माछरे व त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचार्‍यांनी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत 29 जानेवारीला अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीने करण्यात आला. त्या निषेधार्थ संत जनाबाई मंदिर ते गंगाखेड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत पोलीस निरीक्षक यांचा निषेध व धिक्काराच्या घोषणा दिल्या होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले असल्याने हा मोर्चा बेकायदेशीररित्या काढून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. तसेच या मोर्चादरम्यान पोलिसांबद्दल चुकीचे सांगून जनतेत पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यात आली, असा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दिलेल्या तक्रारीवरून 300  पेक्षा अधिक मोर्चेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget