(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani Child Marriage : परभणीत बालविवाहाचे सत्र सुरूच, आज पुन्हा एकाच दिवशी चार बालविवाह रोखले
Parbhani Child Marriage : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी चार बालविवाह रोखण्यात प्रशासनाच्या पथकाला यश आले आहे.
Parbhani Child Marriage : परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे ( Child Marriage ) सत्र सुरूच आहे. आज पुन्हा गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी चार बालविवाह रोखण्यात प्रशासनाच्या पथकाला यश आले आहे. मागच्या चार दिवसात जिल्ह्यात नऊ बालविवाह रोखले गेले आहेत. बाल विवाहमुक्त परभणी अभियाना अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
परभणी जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालविवाह मुक्त परभणी हे अभिमान सुरू केले असून या अभियानांतर्गत चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बालविवाहाबाबत माहिती मिळाली की तात्काळ कारवाई केली जात आहे. चार दिवसांपूर्वी जिंतूर आणि सोनपेठमध्ये एकाच दिवशी पाच ठिकाणी लावण्यात येणारे बालविवाह या पथकाने रोखले होते. आज पुन्हा हा प्रकार गंगाखेड तालुक्यात होत होता. चार ठिकाणी होणारे बालविवाह आज या पथकाने रोखले असून यातील अल्पवयीन वधू वरांसह त्यांच्या पालकांना बालकल्याण समिती समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Parbhani Child Marriage : चार दिवसात रोखले नऊ बालविवाह
चाईल्डलाईन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने परभणीत गुरुवारी (9 मार्च) एकाच दिवशी पाच बालविवाह रोखले होती. त्यानंतर आज चार बालविवाह रोखले. या पथकाने चार दिवसात तब्बल नऊ बालविवाह रोखले आहेत.
परभणीच्या सोनपेठ आणि जिंतुर तालुक्यात बाल विवाह लावले जात असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर आली. त्यानंतर चाईल्ड लाईनचे समन्वयक संदीप बेंडसुरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिकडे यांच्या पथकांनी थेट गावात जाऊन हे बालविवाह रोखले. सोनपेठ तालुक्यात 15, 16 आणि 17 वर्षाच्या तीन मुलींचे विवाह गुरूवारी रोखण्यात आले तर त्याच दिवशी जिंतूरमध्ये 16 आणि 17 वर्ष वयाच्या मुलींचे विवाह रोखण्यात आले.
महत्वाच्या बातम्या