एक्स्प्लोर
Advertisement
परभणीत मातंग समाजाची ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्काराची तयारी
परभणीच्या मानवत तालुक्यातील रामेटाकळी गावात मातंग समाजातील नागरिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे. परंतु तिथे जाण्यासाठी रस्ताच नाही.
परभणी : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्काराची तयारी केली. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु तहसीलदार, पोलीस निरीक्षकांनी गावात जाऊन सर्व ग्रामस्थांबरोबर वेळीच चर्चा करुन तात्काळ स्मशानभूमीसाठी इतर ठिकाणी जागा देण्याचे आश्वासन दिलं. त्यानंतर तेव्हा गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
परभणीच्या मानवत तालुक्यातील रामेटाकळी गावात मातंग समाजातील नागरिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे. परंतु तिथे जाण्यासाठी रस्ताच नाही. वारंवार मागणी करुनही प्रशासनाने याकडे लक्ष न दिलं नाही. त्यातच काल (15 डिसेंबर) गावातील लक्ष्मण नवगिरे यांचा मृत्यू झाला. मात्र स्मशानभूमीकडे जाता येत नसल्याने, नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोरच त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली.
मात्र तणाव वाढल्याने पोलीस आणि तहसीलदार गावात दाखल झाले. त्यांनी स्मशानभूमीसाठी इतर ठिकाणी जागा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला आणि गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement