एक्स्प्लोर

Parambir Singh: परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील दोन निलंबित पोलीस पुन्हा सेवेत, अटकेनंतर करण्यात आली होती निलंबनाची कारवाई

Parambir Singh: दहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले.

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) खंडणी प्रकरणात  निलंबित दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत  रूजू करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके अशी सेवेत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्यांची नावे आहे.  अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती

 नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार  दाखल केली होती.

परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे. 

ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच

परमबीर सिंह खंडणीप्रकरणात गोपाळे आणि कोरके यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, शिंदे - फडणवीस सरकार येताच  नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे.  आता महाविकास आघाडीच्या  काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काय होते आरोप?

परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती.  या प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी 50 लाखांची खंडणी मागितली. . याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Doctor Case:उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर प्रकरण,चौकशी सुरू,कारवाई करणार-गृहराज्यमंत्री
Satara Doctor Case : डॉक्टर महिलेने संपवलं जीवन, पोलिसावर गंभीर आरोप, संपूर्ण बातमी
Meghana Bordikar : कुणालाही पाठीशी घातलं जाणाक नाही, आरोपींवर कठोर कारवाई करणार- बोर्डीकर
Rupali Thombare : 'रक्षकच भक्षक बनले', Police अधिकाऱ्यांवर कारवाई करा - Rupali Thombre
Pankaj Bhoyar on Satara Doctor : दोषी पोलिसांवर कठोर कारवाई होईल; गृह राज्यमंत्र्यांचं आश्वासन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
Nashik Crime: नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Virat Kohli : विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
Harshvardhan Rane On His Father: 'माझ्या वडिलांना मी 5-6 पार्टनर्ससोबत लपूनछपून पाहायचो...'; 'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्याचा खुलासा
'माझ्या वडिलांना मी 5-6 पार्टनर्ससोबत लपूनछपून पाहायचो...'; 'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्याचा खुलासा
Embed widget