एक्स्प्लोर
Pankaj Bhoyar on Satara Doctor : दोषी पोलिसांवर कठोर कारवाई होईल; गृह राज्यमंत्र्यांचं आश्वासन
सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक गोपाल बडने (PI Gopal Badane) आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बंडकर (Prashant Bandkar) यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप आहेत. यावर प्रतिक्रिया देताना गृह राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी, 'चौकशी करुन अहवाल प्राप्त होताच तातडीने जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल,' अशी ग्वाही दिली आहे. डॉ. मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक बडने यांनी बलात्कार केला तर बंडकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
















