एक्स्प्लोर

Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात, क्रुझर पलटी झाल्याने 2 जागीच ठार, 12 जण जखमी

परभणीच्या चार ठाण्याजवळ क्रुझर चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात 

Parbhani Accident: परभणीच्या जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. चारठाणा परिसरातील वळण रस्त्यावर क्रुझर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन पलट्या खात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेले. यावेळी जीपमधील दोघे जागीच ठार झाले असून 12 जण गंभीर जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

साईबाबाच्या दर्शनाला गेलेले हिंगोली जिल्ह्यातील कनका गावातील हे भाविक होते. दर्शन घेऊन गावी परतत असताना वळण रस्त्यावर एम.एच. 22 यू 4352 या क्रमांकाच्या क्रुझर जीपचा अपघात झाला. क्रुझर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन आदळले. यावेळी जीपमधील रुक्मिणी चंदू चाभाडे (वय 35 वर्ष) व दीपक सखाराम जाधव (वय 36 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. इतर 12 भाविक जखमी झाले. 

अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्यासह टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

गोरोगावमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा अपघात

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खोल खाली पडल्याने अपघात होऊन यात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वैभव रामदास गमरे (28 वर्षे) आणि आनंद इंगळे (21 वर्षे) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी ADR दाखल करून घेतलं असून ही मुले दारूचे नशेत गाडी चालवत होते का किंवा कशामुळे हा अपघात झाला या संदर्भात अधिक तपास करत आहे. 

हेही वाचा:

Mumbai Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा अपघात, दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू, गोरेगावमधील घटना

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget