एक्स्प्लोर

पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व तर मालेगावात रस्सीखेच

मुंबई : पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेसाठी आज मतमोजणी पार पाडली. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ उमललं. इथे भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. तर भिवंडी-निजामपूर महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. काँग्रेसने 47 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं. मालेगाव महापालिकेत सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र इथे, शिवसेना, भाजप आणि एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ

पनवेल : पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पनवेल महानगरपालिकेवर भाजपचं कमळ उमललं. रायगड जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या शेकापचं मोठं आव्हान भाजपसमोर होतं. मात्र शेकाप महाआघाडीची धुळदाण करत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याचं चित्र आहे. तसंच शिवसेनेने मोठा जोर लावल्यानंतरही शिवसेनेच्या पदरी निराशा पडली आहे. पनवेल महापालिका : 78 जागा मॅजिक फिगर :  40 पक्ष                         जागा भाजप                       51 शेकाप                       23 काँग्रेस                      02 राष्ट्रवादी                   02 पनवेल महापालिकेचा विभायनिहाय निकाल

भिवंडीच्या सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे

भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपने भिवंडी महापालिका खेचण्यासाठी विशेष जोर लावला होता. पण भाजपला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथे शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले. भिवंडी महापालिका : 90 जागा मॅजिक फिगर : 46 पक्ष                  जागा काँग्रेस                47 भाजप                19 शिवसेना              12 कोणार्क विकास आघाडी   04 समाजवादी पक्ष         02 आरपीआय             04 राष्ट्रवादी काँग्रेस         00 अपक्ष                 02

मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर

मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटामध्ये छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे. काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा मिळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला 26 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय शिवसेनेला 13 जागांवर यश मिळालं. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत. मालेगाव महापालिका  : 84 जागा मॅजिक फिगर : 43 पक्ष                                                जागा काँग्रेस                                            28 राष्ट्रवादी (20)+जनता दल (6)       26 शिवसेना                                        13 भाजप                                            09 एमआयएम                                   07 इतर                                              01 मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निहाय ------------- पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व तर मालेगावात रस्सीखेच BMC Election 2017 LIVE
  • LIVE : भिवंडी : भाजप 20, शिवसेना 12, काँग्रेस 46, राष्ट्रवादी 0, सपा 2, कोणार्क विकास आघाडी 4, रिपाइं 4, अपक्ष 2
  • LIVE : मालेगाव मनपा अंतिम निकाल : भाजप 9, काँग्रेस 28, राष्ट्रवादी 26, शिवसेना 13, MIM 7, इतर 1 जागा
  • LIVE : भिवंडी: भाजप 19, शिवसेना 14,काँग्रेस 43, राष्ट्रवादी 0, सपा 2 अपक्ष/इतर 10
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 51, शिवसेना 0, शेकाप महाआघाडी 25 जागा
  • LIVE : भाजपच्या विजयावर शेकापचा आक्षेप, खारघर, खांदा कॉलनीत EVM मध्ये छेडछाड केल्याचा आरोप
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 16, काँग्रेस 42, राष्ट्रवादी 0, शिवसेना 11, कोणार्क विकास आघाडी 4, सपा 2, रिपाइं 4, इतर 2 जागा
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 12, काँग्रेस 25, राष्ट्रवादी 1, शिवसेना 11, कोणार्क विकास आघाडी 6, सपा 3, रिपाइं 4, इतर 2 जागा
  • LIVE : मालेगाव मनपा : भाजप 3, काँग्रेस 28, राष्ट्रवादी 26, शिवसेना 11, MIM 7, इतर 1 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 45, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 15 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 40, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 15 जागा
  • LIVE : भिवंडी: भाजप 12, शिवसेना 12, काँग्रेस 17, राष्ट्रवादी 1, सपा 3, कोणार्क विकास आघाडी 4, रिपाइं 2
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 12, काँग्रेस 17, राष्ट्रवादी 1, शिवसेना 12, कोणार्क विकास आघाडी 4, सपा 3, रिपाइं 2, इतर 1 जागा
  • LIVE : मालेगाव : भाजप 3, शिवसेना 10, काँग्रेस 30, राष्ट्रवादी 24, MIM 11, इतर 2 जाग, प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 11, काँग्रेस 17, राष्ट्रवादी 1, शिवसेना 11, कोणार्क विकास आघाडी 4, सपा 5, रिपाइं 4, इतर 1 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 34, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 15 जागा
  • LIVE : भिवंडी मनपा - प्रभाग  21 मध्ये शिवसेना पॅनल विजयी, अशोक भोसले, वंदना काटेकर, अलका चौधरी मनोज काटेकर यांचा विजय
  • LIVE : पनवेल मनपा : 30 पैकी 23 जागांवर भाजपचा विजय
  • LIVE : मालेगाव मनपा : भाजप 3, काँग्रेस 30, राष्ट्रवादी 24, शिवसेना 9, MIM 11, इतर 2 जागा
  • LIVE : भिवंडी मनपा : प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपचे 3 उमेदवार तर एक अपक्ष विजयी
  • LIVE : भिवंडी मनपा : प्रभाग 21 मध्ये पती-पत्नी विजयी, शिवसेना उमेदवार मनोज काटेकर यांचा सहाव्यांदा तर वंदना काटेकर पाचव्यांदा विजय
  • LIVE : पनवेल मनपा : प्रभाक क्रमांक 17 मधून माजी नगराध्यक्ष संदीप पाटील (शेकाप) पराभूत
  • LIVE : पनवेल मनपा: प्रभाक क्रमांक 17 मधून राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या कन्या शिवानी घरत पराभूत
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजपची मोठ्या आघाडीकडे वाटचाल, कार्यकर्त्यांचा जल्लोष
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 1, शिवसेना 8, कोणार्क विकास आघाडी 4, रिपाइं 4, इतर 1 जागा
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 8, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 3, शिवसेना 8, कोणार्क विकास आघाडी 4, रिपाइं 4, इतर 1 जागा
  • LIVE : भिवंडी मनपा : वॉर्ड क्रमांक 2मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी; इमरान वली मोहम्मद खान, मिसबाह इमरान खान, अहमद सिद्दीकी, नमरा औरंगजेब यांचा विजय
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 28, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 11 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : भाजपची जोरदार मुसंडी, आघाडी असलेल्या 23 पैकी 19 जागांवर विजय
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 23, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 11 जागा
  • LIVE : भिवंडी: भाजप 10, शिवसेना 7,काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5, कोणार्क विकास आघाडी 4 जागा
  • LIVE : सांगली- शिराळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता, 17 जागांपैकी राष्ट्रवादी 11 तर भाजपा 6 जागांवर विजयी
  • LIVE : मालेगाव मनपा : माजी उपमहापौर, भाजप उमेदवार नरेंद्र सोनवणे पराभूत
  • LIVE : चंद्रपूर - नागभीड नगरपरिषद मतमोजणी सुरु, 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी मतमोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत, भाजप 3, काँग्रेस 3 जागा
  • LIVE : भिवंडी: भाजप 10, शिवसेना 7, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5, कोणार्क विकास आघाडी 4 जागा
  • LIVE : मालेगाव मनपा : भाजप 1, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, शिवसेना 7, MIM 1, इतर 1 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 20, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 11 जागा
  • LIVE : भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेससमोर सत्ता राखण्याचं आव्हान
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 10, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5, शिवसेना 5, कोणार्क विकास आघाडी 4, रिपाइं 1, इतर 1 जागा
  • LIVE : मालेगाव मनपा : भाजप 0, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, शिवसेना 4, MIM 1, इतर 1 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : प्रभाग 17 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 7, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 4, शिवसेना 1, कोणार्क विकास आघाडी 4, रिपाइं 1, इतर 1 जागा
  • LIVE : पनवेल मनपा : भाजप 19, शेकाप महाआघाडी 8 जागा
  • LIVE : भिवंडी मनपा : भाजप 7, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 4, शिवसेना 1, कोणार्क विकास आघाडी 4 जागा
  • LIVE : मालेगाव मनपा - काँग्रेसला पाच जागांवर आघाडी
  • LIVE : मालेगाव मनपा - काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, MIM 1, इतर 1
  • LIVE : पनवेल मनपा : शेकाप महाआघाडीने खातं उघडलं, 2 जागी आघाडी
  • LIVE : भिवंडी मनपा : पहिल्या फेरीत भाजप 5, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 3 आणि शिवसेना 1 जागा
  • मालेगाव मनपा : काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, MIM 1, इतर 1
  • LIVE : मालेगावमध्ये MIM ने खातं उघडलं, एका जागेवर आघाडी
  • LIVE : पनवेलमध्ये भाजपने खातं उघडलं, वॉर्ड 17 मध्ये आघाडी
  • LIVE: मालेगावात 83 जागांची मतमोजणी,एक बिनविरोध, वॉर्ड 19 अ मधून काँग्रेसच्या किश्वरी अश्रफ कुरेशी विजयी
  • LIVE: पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेची मतमोजणी, मालेगावात काँग्रेसला 2 जागेवर आघाडी
  • LIVE: पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी मतमोजणी सुरु, आधी पोस्टल मतांची मोजणी
----------------------------- मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झालं असून 418 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. भिवंडीत 5 केंद्रांवर मतमोजणी होईल. निकालादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भिवंडीमध्ये चार प्रभागांच्या पॅनल पद्धतीने होणारी पहिलीच निवडणूक एकूण प्रभाग -  90 (चार उमेदवारांचे 21 आणि 3 उमेदवारांचे 2) पक्षनिहाय उमेदवार :
  • काँग्रेस – 65
  • भाजप + रिपाई – 57
  • शिवसेना – 55
  • समाजवादी पार्टी – 36
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 33
  • कोणार्क विकास आघाडी – 16
  • भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट – 16
  • अपक्ष – 180
  • एकूण उमेदवार – 458
आघाडी : समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, बाकी सर्व पक्ष स्वबळावर प्रमुख लढत काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि सपा-राष्ट्रवादी आघाडीत होणार. 2012 सालच्या निवडणुकीचं पक्षीय बलाबल
  • काँग्रेस– 26
  • समाजवादी पक्ष – 17
  • शिवसेना – 16
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 8
  • भाजप – 8
  • कोणार्क विकास आघाडी – 6
  • रिपाई – 2
पहिली अडीच वर्ष महापौर – प्रतिभा पाटील (कोणार्क विकास आघाडी) – सपा आणि काँग्रेसच्या पाठींब्याने) दुसरी अडीच वर्ष महापौर : तुषार चौधरी (शिवसेना) – सपा आणि काँग्रेसच्या पाठींब्याने) मालेगाव महानगरपालिका पक्षीय बलाबल
  • शिवसेना-11
  • काँग्रेस-25
  • शहर विकास आघाडी-8
  • तिसरा महाज-19
  • मालेगाव विकास आघाडी-4
  • समाजवादी पार्टी-1
  • जनता दल-4
  • मनसे-2
  • जनराज्य आघाडी-1
  • अपक्ष-5
  • एकूण 80
सत्ता- काँग्रेस आणि तिसरा महाज एकत्रित येत महापौर काँग्रेसच्या ताहेरा रशीद शेख. यावेळी 21 प्रभागातून 84 उमेदवार निवडूण येणार
  • काँग्रेस-73
  • राष्ट्रवादी-52
  • जनता दल-10
  • भाजप -55
  • शिवसेना-26
  • एमआयएम-35
  • इतर आणि अपक्ष-101
मालेगाव महापालिकेतील प्रमुख लढती
  • मालेगाव महापालिकेत यंदा राष्ट्रवादी आणि जनता दल यांची युती
  • काँग्रेस, भाजप, शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.
  • काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख हे प्रभाग क्रमांक 20 ड मधून उभे आहेत.
  • शिवसेना-संजय दुसाने प्रभाग क्रमांक-9 ब
  • भाजप महानगर प्रमुख सुनिल गायकवाड-प्रभाग 9 ड
  • जनतादलाचे शहर अध्यक्ष बुलंद एकबाल निहाल अहमद-प्रभाग 12 ड
  • एमआयएमचे शहर अध्यक्ष माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा प्रभाग क्रमांक 17 अ मधून निवणूक लढत आहेत.
  • प्रभाग क्रमांक 20 ब मधून काँग्रेसच्या माजी महापौर ताहेरा रशीद शेख या निवडणूक लढवित आहेत.
पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक
  • महाआघाडीमध्ये शेकाप 48, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 12 जागेवर लढत आहे.
  • भाजप- 78
  • शिवसेना-65
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना- 13
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Embed widget