एक्स्प्लोर
एक वर्षानंतरही रस्त्याचं काम अपूर्ण, पंकजांचा कंपनीला कंत्राट काढून घेण्याचा इशारा
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या रस्त्याचं काम दोन दिवसात सुरु करण्याचा आदेश दिला आहे. अन्यथा कंत्राट काढून घेतलं जाईल, असा इशारा त्यांनी संबंधित कंपनीला दिला.
बीड : राज्यभरातील खराब रस्त्यांची अवस्था वेगळी सांगण्याची गरज नाही. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीतही हीच अवस्था आहे. बीड जिल्ह्यातील परळी ते पिंपळा या महामार्गावर जवळपास 18 ते 20 किमी रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र त्याचं अद्यापही काम सुरु झालेलं नाही. पंकजा मुंडे यांनी या रस्त्याचं काम दोन दिवसात सुरु करण्याचा आदेश दिला आहे. अन्यथा कंत्राट काढून घेतलं जाईल, असा इशारा त्यांनी संबंधित कंपनीला दिला.
हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 134 कोटी रूपये खर्च करून तयार होणाऱ्या या रस्त्याचं काम रत्नाकर गुट्टे यांच्या सुनील हायटेक या कंपनीला मिळालेलं आहे. पण त्यांनी ते काम आयडी इन्फ्रा कंपनीकडे सोपवलं आहे.
परळी ते पिंपळा धायगुडा या 18 किमीपेक्षा अधिक लांबीच्या रस्त्याचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी मध्ये रूपांतर झालेलं आहे. हा रस्ता आता तीन पदरी होणार आहे. गेल्या वर्षी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने याचं काम वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे.
कंत्राटदाराने काम सुरू करून एक वर्ष उलटून गेलं तरी अतिशय संथ गतीने काम चालू आहे. ते अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही. काम सुरू करताना एका बाजूने रस्ता खोदत दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करणं आवश्यक असताना संपूर्ण रस्ताच कंत्राटदाराने उखडून ठेवला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे. दोन्ही बाजूने रस्ता उखडल्यामुळे, पुरेशा प्रमाणात पाणी न टाकणे, व्यवस्थित दबाई न केल्याने वाहनधारकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याच्या संथ गतीने सुरु असलेल्या कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर व्यंगचित्र वायरल केली आहेत. रस्त्याचं काम सुरु होत नसल्याने राष्ट्रवादीने आंदोलनाची तयारी केली आहे. त्यातच आता पंकजा मुंडेंनी दोन दिवसात काम सुरु करण्याचे आदेश दिल्याने लवकरात लवकर रस्ता तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement