एक्स्प्लोर
... तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, पंकजांचं धनंजय मुंडेंना उत्तर
'आठवणीतले गोपीनाथ मुंडे' या कार्यक्रमाचं पिंपरीत आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

पिंपरी चिंचवड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला असेल तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 'आठवणीतले गोपीनाथ मुंडे' या कार्यक्रमाचं पिंपरीत आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘मी भावनिक नाही, पण भावनेने राजकारण करते’, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांना मानत असलेल्या वर्गाला आपलंसं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. ''गोपीनाथ मुंडेंवर भाजपवाल्यांनी अन्याय केला आणि खापर आपल्या माथी फोडलं'', असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी 11 जानेवारी रोजी जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केलं होतं. त्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. ''भाजपवाले लबाड असून त्यांनी कोणालाच सोडलं नाही. ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाड्या-वस्ती, तांड्यांवर वाढवला. ते हयात असताना भाजपने काय त्रास दिला हे सर्वांना माहित आहे. त्रास भाजपने दिला, मात्र त्याचं खापर माझ्या माथी फोडलं,'' असं धनंजय मुंडे म्हणाले होते. बातमीचा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























