एक्स्प्लोर

विधानपरिषदेत पंकजा आणि धनंजय मुंडेंची एकमेकांवर स्तुतीसुमनं!

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी चक्क एकमेकांचं कौतुक केलं. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना विधान परिषदेत आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना विधान परिषदेत आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कधी नव्हे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना धनंजय मुंडे म्हणाले की, अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झालं आहे. त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे. त्यावर पंकजांनीही कुपोषण कमी झाल्याची कबुली दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे आभार मानले. ''कुपोषण वाढलं असल्याचं सांगत नेहमी टीका होते. मात्र कधी नव्हे ते माझ्या खात्याचं या सभागृहात कौतुक केल्याबद्दल आभार मानते,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनीही यावर लगेच उत्तर दिलं. ''मन मोठं करुन माझे आभार मानले. तसंच अंगणवाडी सेविकांचं मानधनही 10 हजार रुपये करावं, मन मोठं करावं,'' अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. एकमेकांवर नेहमी टोकाची टीका करणाऱ्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांच्या कौतुकाची भाषा केली. त्यामुळे काही वेळासाठी सभागृहात कधीही न पाहिलेलं चित्र निर्माण झालं होतं. दरम्यान, अंगणवाडी सेविकांचं आंदोलन दाबण्यासाठी त्यांच्यावर मेस्मा लावण्यात येत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मात्र मेस्मा लावण्याचा निर्णय हा अन्यायकारक नाही. कुपोषित बाळाला दोन ते तीन दिवस पोषण आहार भेटला नाही, तर मृत्यूचं संकट ओढावतं. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. संबंधित बातम्या :

विरोधीपक्ष आणि पालकमंत्री एकत्र आल्यास महालक्ष्मीची पूजा करेन : चंद्रकांत पाटील

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे : पंकजा मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget