एक्स्प्लोर
पंढरपुरात दिवाळीनिमित्त विठ्ठल-रखुमाईला दागिन्यांचा साज
दिवाळीला विठ्ठल भक्त देवाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात, मात्र एसटी बसचा संप असल्याने भाविकांना पंढरपूरपर्यंत पोहचणं कठीण झालं
पंढरपूर : दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात नरकचतुर्दशीला विठ्ठल रुक्मिणी सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांनी नटले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या संपामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मात्र मंदिरात भाविकांचा शुकशुकाट आहे.
दरवर्षी दिवाळीला विठ्ठल भक्त देवाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात, मात्र एसटी बसचा संप असल्याने भाविकांना पंढरपूरपर्यंत पोहचणं कठीण झालं आहे. स्थानिकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
सध्या रेल्वे गाड्या मात्र भरभरुन येत असून खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. आज दिवाळीसाठी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दिवाळीत देवाला सोन्याच्या विविध दागिन्यांनी मढवले जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement