एक्स्प्लोर
विठुरायाच्या गाभाऱ्याची सुरक्षा पाहणाऱ्या ‘तेजा’ने घेतला अखेरचा श्वास
2016 मध्ये तेजाला विशेष कामगिरीसाठी गोल्ड मेडल तर 2017 मध्ये सिल्व्हर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले होते.
पंढरपूर : दररोज विठुरायाच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात, त्यांचे निर्वेध दर्शन होण्यासाठी सुरक्षेचे काम पाहणाऱ्या तेजाने अखेरचा श्वास घेतला. तेजाचे काल (सोमवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. शासकीय मानवंदना देऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉम्ब शोधक पथकातील तेजा हा लॅब्रेडॉर जातीचा श्वान होता. गेली 9 वर्षे अखंड विठ्ठल मंदिरात सुरक्षेचे काम पाहत होता.
तेजा दररोज बॉम्बची तपासणी करण्यासाठी मंदिरात येत असत. मंदिरात आल्यावर गाभाऱ्यातील तपासणी करण्यापूर्वी तो पहिल्यांदा न चुकता देवासमोर नतमस्तक होत असे आणि मगच तपासणीला सुरुवात करत. तसे लॅब्रेडॉर जातीचे श्वान प्रशिक्षित असतात मात्र त्याला कधीही देवाच्या पाया पडण्याचे शिक्षण दिले नसल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले.
तेजा गेली नऊ वर्षे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सेवा कार्यरत होता. 2016 मध्ये तेजाला विशेष कामगिरीसाठी गोल्ड मेडल तर 2017 मध्ये सिल्व्हर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले होते. विठ्ठल मंदिरातील बंदोबस्तासोबत गेल्या नऊ वर्षात गुन्हे उघडकीस आणण्यात तेजाने आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले होते.
तेजाने काल (सोमवारी) अखेरचा श्वास घेतल्याने आजपासून तेजाची जागा दुसरा श्वान घेइल मात्र तेजाची कमतरता थेट विठुरायाला देखिल जाणवल्याशिवाय राहणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement