मनोहर भोसलेचा जेलमधील मुक्काम तीन दिवसांनी वाढला
मनोहर भोसले हा एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवत स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो, असा दावाही क्रांतिकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे
पंढरपूर : बाळूमामाचा शिष्य असल्याचे भासवून फसवणूक केले प्रकरणी बारामती पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनोहर भोसले न्यायालयाने अजून तीन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याने त्याचा जेल मधला मुक्काम वाढला आहे. अशातच राज्यातील अनेक भक्तांचा डेटा घेऊन हा मनोहर भोसले तीच माहिती भविष्य म्हणून सांगायचं असा दावा क्रांतिकारी आवाज संघटनेचे मच्छिंद्र टिंगरे याने केला आहे . मनोहर भोसले हा भक्त समोर येताच जी माहिती सांगायचं ती सरकारी पोर्टल वरून घेतलेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फसवणूक आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल झालेल्या मनोहरमामाची राजकारणी आणि बड्या मंडळींना भुरळ
मनोहर भोसले हा एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवत तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो, असा दावाही क्रांतिकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे. मनोहर भोसले कार्यकर्ते लोकांकडून बाहेर महाराजांना भेटण्यासाठी पावती फाडत असतात. त्यावेळी पावतीवर नागरिकांचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर टाकून घेतला जातो. भक्तांना दोन तास प्रतीक्षा करायला लावली जाते. दरम्यानच्या काळात माय रेशन या शासकीय पोर्टलमधून संपूर्ण कुटुंबाची माहिती काढून तीच माहिती भक्ताच्या दिली जाते, अशी हात चलाखी करून मामा भक्तांना उल्लू बनवत असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे.
या शिवाय मनोहर भोसले याचा बॉडीगार्ड राघू देवकर हा पोलीस कर्मचारी मामाच्या भेटण्याच्या फी चे रक्कम स्वतःच्या अकाऊंटवर घेत होता असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तपासात सबळ पुरावे आढळल्यास पोलीस कर्मचारी राघू देवकर हा आता आरोपी होण्याची शक्यता आहे. सोलापूर येथे दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणातील महिलेचे भविष्य सांगताना मनोहर भोसले याने त्या महिलेला तुझे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचे चिठ्ठीत लिहून दिले होते. यात बारामती शहरातील एका राजकीय नेत्याचे नावं टाकल्याने मनोहर मामाने बारामतीमध्ये स्वतःताच्या अडचणी वाढवून ठेवल्या आहेत.
Manohar Bhosale | भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना बारामती पोलिसांकडून अटक
दुसरीकडे क्रांतीकारी आवाज संघटनेने पहिल्यापासून दावा केला होता की, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, रात्रीस खेळ चाले, 100 डे या मालिकांना पैसा पुरविला आहे. याचा निर्माता संतोष गजानन आयचीत हा मनोहर भोसलेचा व्यावसायिक पार्टनर आहे. बारामती येथील गुन्ह्यात जप्त केलेली गाडी ही संतोष आयचित याच्या नावावर आहे. त्यामुळेच बेकायदा मार्गाने जमवलेल्या पैशात संतोष आयचीत देखील भागीदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
Balu Mama : लोकसंत बाळूमामांच्या भक्तांमध्ये बेबनाव, अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, प्रकरण नेमकं काय?
एवढी प्रॉपर्टी आली कोठून?
मनोहर भोसले हा 2013पर्यंत झोपडीत राहत होता. आज त्याने पत्नीच्या नावावर 44 लाख रुपये किंमतीची 27 एकर जमीन, उंदरगाव येथे दीड एकर जमीन, उंदरगाव येथे एक हजार स्क्वेअर फूट चा बंगला, उंदरगाव येथे मठ, बारामती येथे मठ, महागडे फर्निचर, महागडे मोबाईल, लाईट पाणी, संरक्षक भिंती, असा खर्च कुठून होतो असा प्रश्न क्रांतीकारी आवाज संघटनेने विचारला आहे. मनोहर भोसले यांनी रजिस्टर केलेली शिवसिद्धी संचालित मामा संस्था ही बारामतीत रजिस्टर असताना देणग्या मात्र उंदरगाव येथे गोळा केल्या जातं आहेत. शिवाय या देणग्या कशासाठी गोळा केल्या जातं आहेत याचं कारण पावतीवर नमूद केले नाही, असे मत मच्छिंद्र टिंगरे यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले आहे. या पत्रकार परिषदेला मच्छिंद्र टिंगरे नानासाहेब साळवे, आकाश दामोदरे आदी उपस्थित होते.