फसवणूक आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल झालेल्या मनोहरमामाची राजकारणी आणि बड्या मंडळींना भुरळ
लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा (Balu Mama) यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु आहे. बाळूमामा यांचा भक्त म्हणून ओळख असलेल्या मनोहर भोसले यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पंढरपूर : करमाळा तालुक्यातील उंदरंगाव सारख्या छोट्याश्या गावात दर अमावास्येला येणाऱ्या हजारो किमती गाड्या आणि त्यातून येणारी राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मंडळी ज्या मनोहरमामा याला भेटायला यायची तो मनोहरमामा आज फसवणूक आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात गजाआड गेला आहे. मनोहरमामा हा या बड्या राजकीय लोकांना त्यांचे भविष्य सांगून मार्गदर्शन करत असेय
राजकीय लोकांना सत्तेच्या लोभामुळे अशा बुवा बाबांची गरज लागते हा इतिहास आहे . आजही पुणे , पिंपरी चिंचवड भागातील अनेक गुंठामंत्री आणि वाळू किंग या मनोहरमामाच्या भजनी लागले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही मंडळी तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात होते तर काहींना मोक्याच्या जागेवर डोळा होता. अशी मंडळी या मामाच्या सल्ल्यासाठी आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी या आडवाटेला जात असे.
Balu Mama : लोकसंत बाळूमामांच्या भक्तांमध्ये बेबनाव, अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, प्रकरण नेमकं काय?
या मामाची खासियत काही और होती त्याच्या आणि त्याच्या चेल्याच्या मोबाईलमध्ये राज्यातील बडे नेते मंडळी, अधिकारी यांच्यासोबत फोटो सेव्ह ठेवलेले असायचे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे अशा अनेक बडे नेते आपल्या सोबत संबंध ठेवत असल्याच्या बतावणी मामाचे चेले भक्तांसमोर करत असे. यामध्ये पुणे , नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील काही बडे लोकप्रतिनिधी देखील मामा सोबत फोटोत कैद झाल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील राजकीय कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करीत असे.
Manohar Bhosale | भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना बारामती पोलिसांकडून अटक
उंदरंगाव येथील आश्रमात जायला मुख्य रस्त्यापासून 5 ते 6 किलोमीटर अतिशय अरुंद रस्त्यावरून जावे लागत. तरीही मुख्य रस्त्यापासून आश्रमपर्यंत हजारोंच्या संख्येने मामांच्या भक्तांच्या गाड्या दर अमावास्येला रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या असत. एकंदर मामाकडे नेमकी कोणती विद्या होती हे त्या मामालाच ठाऊक असले तरी राजकीय नेते , बडे अधिकारी , बडे उद्योजक आणि व्यापारी मंडळींना या मनोहरमामाचा चांगलाच लळा लागला होता. आता जगाचे भविष्य सांगणारा आणि मार्गदर्शन देणारा हा मामा स्वतः अडचणीत आला असून याला स्वतःचे भविष्य समजले नाही का असा सवाल आता सोशल माध्यमातून विचारला जात आहे.