एक्स्प्लोर

Nagar Panchayat Election Result: पालघरमधील विक्रमगड नगरपंचायत जिजाऊ संघटनेकडे तर, तलासरी आणि मोखाडामध्ये त्रिशंकू

Nagar Panchayat Election Result: पालघर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले विक्रमगड तलासरी आणि मोखाडा या नगरपंचायती मध्ये चुरशीच्या लढतीत पाहायला मिळाल्या.

Nagar Panchayat Election Result: पालघर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. विक्रमगड तलासरी आणि मोखाडा या नगरपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीत पाहायला मिळाल्या. विक्रमगडमध्ये सर्वच पक्षांना धूळ चारत जिजाऊ संघटना प्रणित विक्रमगड विकास आघाडीने 17 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली. तर, मोखाडा नगरपंचायती मध्ये शिवसेनेला 17 पैकी 8 जागा मिळाल्या असल्या तरीही भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि जिजाऊ संघटना यांना मिळून नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेची पीछेहाट झालेली पाहायला मिळाली. परंतु या दोन्ही नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांना मोठा धक्का बसला आहे. 

तलासरी मध्ये सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची  पीछेहाट झालेली पाहायला मिळाली. या नगरपंचायती मध्ये सुद्धा निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे विक्रमगडची एक हाती सत्ता जिजाऊ संघटनेकडे गेली असली तरीही मोखाडा आणि तलासरी मध्ये कोण सत्ता काबीज करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तलासरी नगरपंचायती मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या नगरपंचायती मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने आपला झेंडा रोवला असून तीन जागा काबीज करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या ठिकाणी एकमेकांचे तिरस्कार करणारे पक्ष एकत्र येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे         

या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्षाच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही नगरपंचायती साठी सभा घेतल्या होत्या मात्र तलासरी वगळता शिवसेनेच्या हाती जास्त काही पडल्याचं दिसत नाही मोखाडा नगरपंचायत मध्ये यापूर्वी एक हाती शिवसेनेची सत्ता होती मात्र येथे विराट सभा घेऊन सुद्धा वजाबाकी पाहायला मिळाली. तर विक्रमगड मध्ये सुद्धा एका जागेवर समाधान मानावे लागले आहे

तलासरी नगरपंचायत निवडणूक- 
एकूण जागा- 17 

पक्ष विजयी जागा
माकप 06
भाजप 06
अपक्ष 01
काँग्रेस 01

विक्रमगड नगर पंचायत-
एकूण जागा-  17

पक्ष विजयी जागा
जिजाऊ संघटना (अपक्ष) 16
शिवसेना 01

मोखाडा नगर पंचायत निकाल-
एकूण जागा- 17

पक्ष विजयी जागा
शिवसेना 08
राष्ट्रवादी 04
भाजप 02
जिजाऊ संघटना 02
काँग्रेस 01

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget