एक्स्प्लोर
शिवसेनेकडून भाजप मंत्र्याच्या कन्येचा पराभव
वाड्याच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर विराजमान झाल्या आहेत. तर सावरा यांची कन्या निशा सावरा पराभूत झाल्या.

मुंबई/पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपला पराभवाचा धक्का दिला आहे. पालकमंत्री आणि आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्येला शिवसेनेने पराभवाची धूळ चारली. वाड्याच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर विराजमान झाल्या आहेत. तर सावरा यांची कन्या निशा सावरा पराभूत झाल्या. या विजयाबद्दल शिवसेना आमदारांकडून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांना समसमान म्हणजे प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला दोन, बहुजन विकास आघाडीला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारलं आहे.
आणखी वाचा























