एक्स्प्लोर

जाळ्यात मिळाले कोट्यवधी किंमतीचे घोळ मासे; मुरबे येथील मच्छिमाराचे नशिब फळफळले

पालघर जिल्ह्यातील मुरबे येथिल मच्छिमाराचे नशिब फळफळले आहे. त्याच्या बोटीच्या जाळ्यात कोट्यवधी किंमतीचे घोळ मासे मिळाले आहेत. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीत हा एक चमत्कारी इतिहास घडल्याची चर्चा.

पालघर : मासेमारीच्या हंगामात मच्छिमारांसाठी रोजचा दिवस सारखा नसतो. कधी मासेमारी चांगली झाली तर भरपूर कमाई आणि हाती काहीच लागले नाही तर शून्य कमाई. पण मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचे नशीब एका रात्रीत फळफळले. त्यांच्या बोटीच्या जाळ्याला लागलेले मासे विकून दीड कोटीहुन अधिकची कमाई झाली आहे. पालघरच्या समुद्रात मासेमारी दरम्यान हा चमत्कार झाला आहे. सोमवारी व्यापाऱ्यांनी दीड कोटींची बोली लावून घोळ मासे खरेदी केले. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबे गाव प्रकाश झोतात आले आहे. यापूर्वी याच गावातील श्री साई लक्ष्मी या बोट मालकाच्या जाळ्यात घोळ मासा अडकला होता. त्यामधील बोताची किंमत साडे पाच लाखाहून अधिक होती.

पालघरच्या हद्दीतील खोल समुद्रात 15 मैल अंतरावर मासेमारीसाठी चंद्रकांत तरे यांच्या मालकीची हरबा देवी बोट घेऊन मासेमारीसाठी काही तरुण हौसेपोटी समुद्रात मच्छीमार बांधवांना घेवुन गेले होते. यावेळी त्यांनी मासेमारी करण्याकरिता वागरा पद्धतीचे जाळे समुद्रात सोडले असताना समुद्रात टाकलेले जाळे जड झाल्यासारखे जाणवल्याने जाळे बोटीत ओढून जवळ घेतले असता दीडशेहून अधिक घोळ मासे जाळ्यात आढळून आले. माशाचे वजन अदाचे 18 ते 25 किलोपर्यंत आहे. घोळ माश्याच्या पोटातील पिशवी (बोत)चा वापर वैद्यकीय कामासाठी केला जातो. एका माश्यामध्ये 300 ते 400 ग्राम वजनाची पिशवी (बोत) मिळण्याचा अंदाज आहे. 1 कोटी 26 लाख रुपयांची बोत आणि माश्याचे मिळून दीड कोटीहून अधिक रक्कम मच्छिमार चंद्रकांत तरे याना मिळणार आहेत.

पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारीत हा एक चमत्कारी इतिहास घडला आहे. आजपर्यंत एकाच वेळी घोळ जातीचे इतक्या मोठ्या संख्येने मासे जाळ्यात अडकले, अशी ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे मूरबे गावातील मच्छीमार बांधवांना मोठा आनंद झाला आहे. घोळ मासा स्वादिष्ट असून त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माशाला विशेष महत्व आहे. माशातील कोलेजनचा वापर अनेक औषधामध्ये  केला जातो. त्यामुळेच घोळ माशाला आशिया खंडाच्या पूर्व भागात मोठी मागणी आहे. याच कारणाने घोळ माशाला 'सोने के दिल वाली मछली' म्हणून ओळखले जाते. हा मासा साधारणपणे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकांग आदी ठिकाणी निर्यात केला जातो. या जातीच्या सर्वात लहान माशाची किंमतही 8 ते 10 हजार रुपये असते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget