Palghar Loksabha : पालघरमधून खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट? भाजपकडून कोणाला उमेदवारी??
भाजपकडून माजी आमदार विलास तरे आणि माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा या दोघांपैकी एकाचे नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पालघर : पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट करण्यात आल्याची चर्चा आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप उमेदवाराचा उद्या तीन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. भाजपकडून माजी आमदार विलास तरे आणि माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा या दोघांपैकी एकाचे नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपने दोन उमेदवारांचे अर्ज विकत घेतले आहेत. उद्या अकरा वाजता पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. डॉ. हेमंत सावरा यांच्या नावाला भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी
पालघर लोकसभेत महाविकास आघाडीचा यापूर्वीच उमेदवार घोषित झाला आहे. ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघर लोकसभेत सहा विधानसभा आहेत. तीन विधानसभेवर हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे पालघर लोकसभेत बविआची (बहुजन विकास आघाडी) महत्त्वाची भूमिका आहे. पालघर लोकसभेत शिवसेनेचे राजेंद्र गावित खासदार आहेत. खासदार असतानाही त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. भाजपनं गेल्या काही दिवसांपासून मेळाव्यांचा धडाका सुरु केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या