एक्स्प्लोर
पालघरमध्ये आता राणे विरुद्ध शिवसेनेत सामना
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते असलेल्या नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली आहे. राणे आणि शिवसेना यांचं वैर सर्वश्रृत आहे.
![पालघरमध्ये आता राणे विरुद्ध शिवसेनेत सामना palghar bypoll 2018: Narayan Rane to campaign for BJP in palghar against shivsena पालघरमध्ये आता राणे विरुद्ध शिवसेनेत सामना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/19154408/NARAYAN-RANE-PC-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचारासाठी भाजपनं खासदार नारायण राणे यांना पाचारण केलं आहे. राणेंना प्रचार करण्याची विनंती चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत राणेही प्रचाराला जाणार असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते असलेल्या नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली आहे. राणे आणि शिवसेना यांचं वैर सर्वश्रृत आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजप राणेंना शिवसेनेविरुद्ध भिडवणार आहे.
चिंतामणराव वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत वनगा कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने चिमामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.
तर भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
पालघरच्या लढतीकडं सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं राणेंना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपनं नवी खेळी खेळली आहे.
भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून' : आशिष शेलार
दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
'कर्नाटकात जिंकलो, मतदारांचे आभार... आता भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून'...' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे.
पालघरमध्ये शिवसेनेनं लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. मात्र, तरीही शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
संबंधित बातम्या
भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून' : आशिष शेलार
पालघर पोटनिवडणूक: शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळला
वनगांऐवजी सावरांचं निधन झाल्याचा उच्चार, दानवे पुन्हा गडबडले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)