पालघर निकाल : पालघर निकालावर शिवसेनेचा आक्षेप
पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल लाईव्ह- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे. त्यांनी 25 हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.

LIVE UPDATE
5. 00PM राजेंद्र गावित विजयी घोषित 3.25 PM पालघर निकालावर शिवसेनेचा आक्षेप, 20, 21, 22, 23, 24 या फेरीत मतदारांच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार 3.00 PM पालघर पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार, संध्याकाळी 5 वा. शिवसेना भवनात पत्रकार परिषद 2.11 चुका झाल्या त्याचं चिंतन करु, पण 2019 मध्ये पुन्हा पालघर जिंकू : श्रीनिवास वनगा2. 11 PM - भाजपने साम-दाम-दंड-भेदचा वापर केला, पण 2019 मध्ये पुन्हा पालघर जिंकू : श्रीनिवास वनगा 1.55 PM काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीमुळे पक्ष सोडला, राजेंद्र गावित यांची प्रतिक्रिया 1. 25 PM 12.40 PM पालघर: 24 वी फेरी - भाजपकडे 26 हजार 476 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 263683,श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 237207,बळीराम जाधव (बविआ) - 208009,दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 46861, किरण गहाला (माकपा) - 71686 1.22 PM पालघर - तेविसावी फेरी - भाजपकडे 25,645 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 257506,,श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 231861,बळीराम जाधव (बविआ) - 200244, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 46079, किरण गहाला (माकपा) - 70826 1.16 PM पालघर - 22 वी फेरी - भाजप 26,867 मतांनी आघाडीवर राजेंद्र गावित (भाजप) - 248316,श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 221449,बळीराम जाधव (बविआ) - 189399,दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 44532, किरण गहाला (माकपा) - 68838 1.10 PM पालघर - भाजपचे राजेंद्र गावित विजयाच्या उंबरठ्यावर, गावितांना 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं 1.00 PM पालघर - एकविसावी फेरी - भाजपला 27,837 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 237151, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 209314, बळीराम जाधव (बविआ) - 179739, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 42887, किरण गहाला (माकपा) - 67611LIVE : #पालघर पोटनिवडणूक : चुका झाल्या त्याचं चिंतन करु, पण 2019 मध्ये पुन्हा पालघर जिंकू : श्रीनिवास वनगा https://t.co/4b0BQQ1LNX pic.twitter.com/Z7e5Tcc1EY
— ABP माझा (@abpmajhatv) May 31, 2018
12. 32. PM पालघर - एकोणीसावी फेरी राजेंद्र गावित (भाजप) - 214030,श्रीनिवास वनगा (शिवसेना) -188307,बळीराम जाधव (बविआ) - 161182,दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 39844, किरण गहाला (माकपा) - 63856 12.24 PM - पालघर - अठरावी फेरी - भाजपकडे 21648 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 201508,,श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 179860,बळीराम जाधव (बविआ) - 151898,दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 38003,किरण गहाला (माकपा) - 61558 12.22 PM - पालघर - सतरावी फेरी - भाजपकडे 22015 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 190492,श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 168477,बळीराम जाधव (बविआ) - 142350,दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 35764, किरण गहाला (माकपा) - 60015 12.15 PM - पालघर - सोळावी फेरी - भाजपकडे 22587 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 179344, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 156757, बळीराम जाधव (बविआ) - 133114, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 33550, किरण गहाला (माकपा) - 55970 12.07 PM - पालघर - पंधरावी फेरी - भाजपकडे 18697 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 166138, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 147441,बळीराम जाधव (बविआ) - 124985, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 31845, किरण गहाला (माकपा) - 55314 12.04 PM - पालघर - 24 फेऱ्या पूर्ण , त्यातही भाजप आघाडीवर -सूत्र 11.55 AM - पालघर - चौदावी फेरी - भाजपकडे 19056 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 155608, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 136552, बळीराम जाधव (बविआ) - 116045, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 30059, किरण गहाला (माकपा) - 54788 11.50 AM - पालघर - तेरावी फेरी- राजेंद्र गावित (भाजप) - 145751, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 125740, बळीराम जाधव (बविआ) - 105846, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 28840, किरण गहाला (माकपा) - 51552 11.43 AM पालघर - बारावी फेरी - भाजपकडे 19742 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 134884, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 115142, बळीराम जाधव (बविआ) - 96177, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 27079, किरण गहाला (माकपा) - 48903 11.32 AM पालघर - अकरावी फेरी - भाजपकडे 18 हजार 489 मतांची आघाडी राजेंद्र गावित (भाजप) - 124166, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 105677 , बळीराम जाधव (बविआ) - 86523, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 25720, किरण गहाला (माकपा) - 46274 11.24 Am पालघर - दहावी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 113183, बळीराम जाधव (बविआ) - 78185, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 95772 , दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 24126, किरण गहाला (माकपा) - 40642 11.20 AM - पालघर - नववी फेरी - भाजपकडे 17843 मतांची आघाडी. राजेंद्र गावित (भाजप) - 102154, बळीराम जाधव (बविआ) - 69963, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 84311, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 22453, किरण गहाला (माकपा) - 37513 11.07 AM पालघर आठवी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) – 91,795, बळीराम जाधव (बविआ) - 62187, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 73387, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 19920, किरण गहाला (माकपा) – 35271 10.52 AM - पालघर - सातवी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 80097, बळीराम जाधव (बविआ) - 54903, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 62680, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 16809, किरण गहाला (माकपा) पालघर - सहावी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 69757,बळीराम जाधव (बविआ) - 47606,श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 52893,दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 13777, किरण गहाला (माकपा) - 28632 10.50 AM - भाजपची घोडदौड सुरुच, राजेंद्र गावितांकडे मोठी आघाडी 10.20 AM पाचव्या फेरीनंतर शिवसेना तिसऱ्यावरुन दुसऱ्या क्रमाकांवर 10. 00 AM भाजप उमेदवार राजेंद्र गावित 14236 मतांनी आघाडीवर पालघर - पाचवी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 56812, बळीराम जाधव (बविआ) - 40362, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 42578, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 10366, किरण गहाला (माकपा) - पालघर - चौथी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 44869, बळीराम जाधव (बविआ) - 33294, श्रीनिवास वनगा (शिवसेना) -34218, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 8606, किरण गहाला (माकपा) - 20887 पालघर - तिसरी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 33464, बळीराम जाधव (बविआ) – 26607, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 26318, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 5994, किरण गहाला (माकपा) - 17581 पालघर - दुसरी फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 23271, बळीराम जाधव (बविआ) - 18923, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 18505, दामोदर शिंगडा (काँग्रेस) - 3422, किरण गहाला (माकपा) - 12131 पालघर - पहिली फेरी - राजेंद्र गावित (भाजप) - 11236, बळीराम जाधव (बविआ) - 11090, श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 8190, दामोदर शिंगडा (काँग्रेस) – 1757, किरण गहाला (माकपा) - 6658, नोटा - 1025
पालघरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतमोजणीची यंत्रणा कोलमडली, एक तासानंतरही पहिल्या राऊंडची आकडेवारी नाही, पत्रकार आणि अधिकाऱ्यांमध्ये वादावादी पोस्टल मतदामोजणीत तांत्रिक अडचण, पोस्टल मतमोजणी अद्याप सुरु नाही पालघर, बोईसर शिवसेना पुढे, विक्रमगडमध्ये माकपा पुढे,नालासोपारा वसई बहुजन विकास आघाडी पुढे पालघर: नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर
विक्रमगडमध्ये अपक्ष 2143 मतांनी आघाडीवर
डहाणूमध्ये भाजपचे राजेंद्र गावित 295 मतांनी आघाडीवर
8.43 AM - बोईसरमध्ये शिवसेना १००० मतांनी पुढे
8.30AM पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप, भाजपकडून पालघरमध्ये झालेलं कथित पैसे वाटप, चिंतामण वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनाप्रवेश, भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यामुळे पालघरची निवडणूक रंजक झाली आहे. या मतदारसंघात 17 लाख 31 हजार 77 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 7 हजार 400 पुरुष तर 8 लाख 23 हजार 592 स्त्री, इतर 85 मतदार आहेत. दरम्यान, आज सकाळी 8 वाजल्यापासून सूर्या कॉलनी येथे मतमोजणी होणार आहे. आज पालघरमध्ये अग्निपरीक्षा आज 31 मे रोजी पालघरमध्ये होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत राहतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ नारनवरे यांनी दिली. संबंधित बातम्या :काँग्रेस नेते राजेंद्र गावित भाजपात, पालघरची उमेदवारी मिळणार
पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश























