एक्स्प्लोर

Padma Awards: हा तर लावणीचा सन्मान, या क्षणी पतीची आठवण येतेय; पद्मश्री मिळाल्यानंतर सुलोचना चव्हाण यांचे डोळे पाणावले

Padma Awards : लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Padma Awards: महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी अशी ओळख असलेल्या सुलोचना चव्हाण यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार माझा नसून महाराष्ट्राच्या लोकसंगीताला मिळालेला पुरस्कार आहे. हा माझा सन्मान नसून लावणीचा सन्मान आहे. या वेळी माझे पती असायला हवे होते अशी प्रतिक्रिया सुलोचना चव्हाण यांनी दिली. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. 

आज माझे पती शामराव चव्हाण असते तर मला खूपच आनंद झाला असता असं सांगताना सुलोचनाताईंचे डोळे पाणावले. सुलोचना चव्हाण म्हणाल्या की, "मला लावणीचे जे काही ज्ञान ते माझ्या पतींच्या मुळे. माझ्या लावणीचे खरे संगीतकार हे माझे पती आहेत. त्यांचेच आशीर्वाद मला लाभलेत. मला चांगलं गाता येत नव्हतं पण त्यांनी माझ्या पतींनी माझ्याकडून ते करुन घेतलं. या क्षणी मला त्यांची खूप आठवण येतेय."

महाराष्ट्रातील या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पद्मविभूषण

  • प्रभा अत्रे - कला
  • राधेशाम खेमका (मरणोत्तर)
  • बिपीन रावत (मरणोत्तर)
  • कल्याण सिंग (मरणोत्तर)

पद्मभूषण

  • सायरस पुनावाला- औषध निर्मिती
  • नटराजन चंद्रशेखरन- व्यापार आणि उद्योग

पद्मश्री

  • विजयकुमार डोंगरे- औषध निर्मिती
  • हिमंतराव बावसकर- औषध निर्मिती
  • सुलोचना चव्हाण- कला
  • सोनू निगम- कला
  • अनिल राजवंशी- विज्ञान आणि अभियांत्रिकी
  • बालाजी तांबे (मरणोत्तर)- औषध निर्मिती
  • भिमसेन सिंगल- औषध निर्मिती

चार भारतीय वंशाच्या व्यक्तींना पुरस्कार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचसोबत ब्रिटनचे नागरिक परंतु भारतीय वंशाच्या डॉ. प्रोकर दासगुप्ता आणि आयर्लंडच्या रुतगेर कॉर्टनहस्ट यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.  

पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो. 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!
हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Kalyan Crime News: क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेसोबत नको ते केलं, गरम पाण्याने हात जाळत सासरच्यांनी केलं सुनेचं 'टक्कल'; कल्याणमधील संतापजनक घटना
क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेसोबत नको ते केलं, गरम पाण्याने हात जाळत सासरच्यांनी केलं सुनेचं 'टक्कल'; कल्याणमधील संतापजनक घटना
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
Weather Update: सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
बीड-जालन्यातही रस्त्यालगत धोकादायक विहिरी; तीन दिवसांत 2 अपघात, 4 जणांचा मृत्यू, ना सुरक्षा कठडे ना उपाययोजना
बीड-जालन्यातही रस्त्यालगत धोकादायक विहिरी; तीन दिवसांत 2 अपघात, 4 जणांचा मृत्यू, ना सुरक्षा कठडे ना उपाययोजना
Embed widget