एक्स्प्लोर
CCTV Footage | नांदेडमध्ये वळूची महिलेला जोरदार धडक, महिला गंभीर जखमी
विशेष म्हणजे त्याठिकाणी दोन महिला आणि एक लहान मुलगी उभी होती. मात्र वळूने लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेलाच धडक दिली.
नांदेड : नांदेडमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेला वळूने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. हा सगळा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, महिला बेसावध असताना वळूने तिला धडक दिली. या महिल्या कडेवर एक लहान बाळही होतं. वळूने बेसावध असलेल्या महिलेला मागच्या बाजूने धडक दिली. धडकेनंतर महिला जवळ 5 ते 10 फूट हवेत फेकली गेली होती.
विशेष म्हणजे त्याठिकाणी दोन महिला आणि एक लहान मुलगी उभी होती. मात्र वळूने लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेलाच धडक दिली. त्यानंतर आजूबाजूचे लोक महिलेच्या मदतीला धावले आणि तिला जवळील रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर शहरातील मोकाट जनावरांवर करवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
ऑटो
क्राईम
Advertisement