एक्स्प्लोर
आपली लढाई 'सत्ता'मेव जयतेसाठी नाही तर सत्यमेव जयतेसाठी : उद्धव ठाकरे
'आम्ही -162' या टॅग लाईनखाली महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार एका छताखाली एकवटले. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये 162 आमदारांची परेड करत महाविकास आघाडीनं शक्तिप्रदर्शन केल. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत भाजपावर निशाणा साधला.
मुंबई : 'आपली लढाई सत्तामेव जयतेसाठी नाही तर सत्यमेव जयतेसाठी आहे', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांना सांगितले. सर्व पक्ष एकत्र आल्याने आपली ताकद वाढलीय. हे कोणत्याही कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये बसणारं चित्र नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आम्ही -162' या टॅग लाईनखाली महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार एका छताखाली एकवटले. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये 162 आमदारांची परेड करत महाविकास आघाडीनं शक्तिप्रदर्शन केल. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत भाजपावर निशाणा साधला.
'शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा पाया विस्तारत चालला आहे. हे दृश्य कोणत्याही कॅमेऱ्यात बंदिस्त करता येणार नाही. आपण ऐवढे मजबूत आहोत की ज्यांच्या डोळ्यात काळोख असेल त्यांच्या डोक्यात किंवा डोळ्यात प्रकाश पडेल', असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही. आम्ही आलो आहोत आमचा अडसर मोकळा करा. वाटेतून बाजूला झाला नाहीत तर तुमचं काय करायचं ते आम्हाला सांगायची गरज नाही. जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला तो आणखी करा म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, 'आडवा येण्याचा प्रयत्न करुन बघा. शिवसेना काय चिज आहे हे 25-30 वर्ष कळाले नसेल तर शिवसेना समोर आल्यानंतर काय करते? हे पहा, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला सुनावले आहे. अडवण्याचा प्रयत्न जेवढा कराल तेवढे घट्टपणाने आम्ही एकत्र येऊ. हे सर्व आमदार खुर्च्या उबवण्यासाठी आले नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेसाठी वाटेल ते करणारी शक्ती आम्ही या मातीत गाढून टाकू, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान आम्ही-162 टॅगलाईन खाली एकाच छताखाली आलेल्या सर्व आमदारांना एकजुट राहण्याची शपथ देण्यात आली आहे. हॉटेल हयातमध्ये तिन्ही पक्षाचे 162 आमदार उपस्थित होते. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात या वेळी उपस्थित होते. 162 आमदारांना एकजूट राहण्याची शपथ दिली याप्रसंगी आमदार फोडाफोडी, दगाफटका टाळण्यासाठी शिवाय भाजप आणि जनतेला आपलं संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement