एक्स्प्लोर

ग्रंथ दिंडीने 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात

उस्मानाबाद येथील संत गोरोबा काका साहित्यनगरी येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद राज्यासह देशभरातून येणाऱ्या मराठी साहित्यप्रेमीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

उस्मानाबाद : उस्मानाबाद इथं होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने झाला आहे. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील ,मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे आणि विक्रम काळे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले आहे. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींसह लहान मुलं मुली आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लेझीम आणि संगीताच्या तालावर ठेका धरला. उस्मानाबाद येथील संत गोरोबा काका साहित्यनगरी येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद राज्यासह देशभरातून येणाऱ्या मराठी साहित्यप्रेमीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. साहित्य संमेलन परिसरातील भिंतीवरती वेगवेगळे चित्र रेखाटण्यात आले आहेत. सामाजिक आशयाच्या चित्रांसह संत गोरोबा काकांचा जीवनप्रवास देखील या चित्रांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद मधील स्थानिक कलावंतांनी हे चित्र रेखाटली आहेत. फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष असल्यानं पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव देखील संमेलनाला हजेरी लावणार आहेत. Sahitya Sammelan | ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाचा शुभारंभ | ABP Majha
साहित्यसंमेलनाची प्रत्येक घडामोड ई-बुक स्वरूपात
साहित्य संमेलन कायमस्वरूपी आठवणीत राहावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाची जोड देखील देण्यात आली आहे.  आता पर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाचे दस्तऐवज सामान्य लोकांना सहज मिळवणं कठीण आहे. हीच गोष्ट लक्षात घेत पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साहित्य संमेलनातील प्रत्येक घडामोड ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल बुक, इकोबुकहट या प्लॅटफॉर्मवर हे ई-बुक निशुल्क मिळणार आहे. विशेष म्हणजे या ई-बुकवर कोणत्याही निर्मात्याचे नाव नसणार आहे. साहित्य जिवंत राहावे आणि सर्वांना सहज उपलब्ध व्हावे या हेतूने या ई-बुकची निर्मिती करण्यात आली आहे.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता. दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असल्यामुळे मराठी साहित्यामध्ये दिब्रिटो यांचे कामच नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड करू नये अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. त्यामुळे संमेलनस्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित बातम्या : नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी टोळी अटकेत, 139 लिटर दूध जप्त ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या ...तर जस्टिस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करु : अनिल देशमुख

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget