(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jogdand Maharaj: विठुरायाच्या पायावर दर्शन सुरू करा, जोगदंड महाराज यांचं शिष्यांसह भजन आंदोलन
Pandharpur Temple: कोरोनाचे संकट सुरू झाल्यावर पहिल्या लाटेत 17 मार्च 2020 मध्ये सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाला आणि देवाचेद्वार ही भाविकांना बंद झाले होते.
Pandharpur Temple: कोरोनाचे संकट सुरू झाल्यावर पहिल्या लाटेत 17 मार्च 2020 मध्ये सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाला आणि देवाचेद्वार ही भाविकांना बंद झाले होते. आता कोरोनाचा धोका संपला आणि सर्वच ठिकाणांचे निर्बंध शिथिल झाले असताना देवाचा दुरावा विठ्ठल भक्तांना सहन होत नाही. आता मंदिरेही नियमितपणे सुरू झाली. अगदी मोठी समजली जाणारी कार्तिकी आणि माघी यात्रा देखील दोन वर्षानंतर उत्साहात साजरी झाली.मात्र अजूनही विठुरायाच्या पायावरच दर्शन सुरू न झाल्याने विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदायात अस्वस्थता आहे.
संपूर्ण भारतात थेट चरणावर मस्तक ठेवायला मिळण्याचे ठिकाण म्हणून विठ्ठल मंदिराची ओळख आहे. याचसाठी रोज हजारो भाविक या देवाच्या चरणांच्या ओढीने पंढरपूरला येत असतात. विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेऊन आपल्या सर्व काळजी चिंता विसरत एक नवी ऊर्जा घेऊन भाविक येथून परत जात असतात. आता कोरोना संकट कमी झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असताना विठुरायाच्या चरणावरील दर्शन व्यवस्था का सुरू नाही, असा सवाल विठ्ठलभक्त विचारू लागले आहेत. देवाच्या पायावर मस्तक ठेवल्याशिवाय ते समाधान तो आनंद मिळत नसल्याची खंत विठ्ठल भक्तांना वाटते आहे.
देव आणि भक्तातील हा दुरावा दूर करण्याची मागणी वारकरी आणि भाविक भक्त आता मुख्यमंत्र्यांना करू लागले आहेत. तातडीने देवाच्या पायावरील दर्शन सुरु व्हावी यासाठी आता वारकरी संप्रदाय देखील आक्रमक झाला आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जोगदंड महाराज यांनी आज आपल्या वारकरी शिष्यांसह नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करीत देवाच्या पायावरील दर्शनाची सुरुवात करण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या-