Maharashtra : आता सॉफ्टवेअर करणार ट्रान्सफर पोस्टिंगचं काम! महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा नवा उपक्रम
Online Transfer Software : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचं पोस्टिंग करणं सोपं झालं आहे.
Transfer of Health Workers Through Software : महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक (Posting) करणं अगदी सोपं होणार आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून आता पोस्टिंगसाठी तंत्रज्ञानाची (Technology) मदत घेतली जाणार आहे. यामुळे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक होणार आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर हे ऑनलाईन ट्रान्सफर आणि पोस्टिंग सुरु करण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ट्रान्सफर आणि पोस्टिंगसाठी ज्या कर्मचाऱ्याचा नंबर लागेल त्याचं ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केलं जाईल.
आता सॉफ्टवेअर करणार ट्रान्सफर पोस्टिंगचं काम
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व ग्रामीण भागात आणि आरोग्य केंद्रांमध्ये अनेक डॉक्टर आणि अनेक आरोग्य कर्मचारी होते, ज्यांची अनेक वर्षांपासून कुठेही बदली झाली नव्हती. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी वर्षानुवर्षे बदली न झालेल्या अशा कर्मचाऱ्यांची ऑनलाइन पद्धतीने बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात प्रथमच हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
आतापर्यंत एक हजार लोकांच्या बदल्या
धीरज कुमार यांनी पुढे सांगितलं की, 'आम्ही काम करुन एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बदली होणार आहे, त्यांना बदलीसाठीचे पर्याय देण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सॉफ्टवेअरने काम केले. कोणाच्याही व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय कर्मचाऱ्यांची ऑनलान पद्धतीने बदली झाली.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा नवा उपक्रम
महाराष्ट्रातील डॉक्टरांसह आतापर्यंत सुमारे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचं ऑनलाइन ट्रान्सफर पोस्टिंग या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितलं की, दरवर्षी आरोग्य विभागाकडून वर्षाला केवळ 5 ते 7 टक्के बदली करण्यात येत होती. दरम्यान आरोग्य विभागाला 30 टक्क्यांपर्यंत बदल्या करण्यास परवानगी आहे.
ट्रान्सफर पोस्टिंगचं काम सोपं
यापूर्वी अनेक अधिकारी 20 वर्षांहून अधिक काळ एकाच आणि रुग्णालयात काम करत होते. त्यामुळे सर्व रुग्णालये आणि तेथे येणाऱ्या रुग्णांना त्याचा लाभ मिळत नव्हता, मात्र महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार या ऑनलाइन पद्धतीने सुमारे 20 टक्के बदल्या झाल्या आहेत.
आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तंत्रज्ञान फार महाग नाही. या सॉफ्टवेअरची किंमत फक्त 10 लाख आहे. या प्रकारचे सॉफ्टवेअर अधिक सरकारी विभागांसाठी तयार केलं तर ट्रान्सफर पोस्टिंगचं अगदी सोपं होऊन यामध्ये पारदर्शकताही राखली जाईल.