एक्स्प्लोर

नाशकात गूगल पे, फोन पेच्या माध्यमातून कॅशबॅकच्या नावाखाली 14 जणांना गंडा

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसात कॅशबॅकच्या नावाखाली 14 जणांना गंडा बसला आहे. फोन पे आणि गूगल पेच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे.

नाशिक : रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करण्यावर लोकांचा कल वाढत चालला आहे. त्यासाठी अनेक जण मनी ट्रान्सफर अॅपचा वापर करतात. मात्र ऑनलाईन व्यवहारही दिवसेंदिवस धोकादायक बनला आहे. कारण ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. तुम्ही पण ऑनलाईन व्यवहार करत असाल आणि त्यातही खास करुन फोन पे किंवा 'गुगल पे' सारख्या अॅप्सचा वापर करत असाल तर काळजी घ्या. कारण नाशिकमध्ये तीन दिवसात 14 नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे..

नाशकात सायबर गुह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता फोन पे आणि गूगल पेच्या नावाखाली 14 नागरिकांची 1 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. "हॅलो सर मी फोन पे कंपनीमधून बोलतोय, आपला कॅशबॅक बराच पेंडिंग आहे. तो तुम्हाला कॅश स्वरुपात घ्यायचा असेल, तर आम्ही सांगतो तसे करा", अशा आशयाचे फोन कॉल नागरिकांना येतात. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एक अॅप डाऊनलोड करा आणि त्या तुमच्या डिटेल्स भरा, असं सांगण्यात येतं. त्यानंतर अकाऊंटमधून पैसे गेल्याचं फसवणूक झालेल्यांनी सांगितलं.

अलताब सैय्यद या तरुणाची अशाप्रकारे 14 हजार 172 रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर अलताबने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फोन पे तसेच गूगल पेच्या नावाखाली त्याच्यासारख्या 14 नागरिकांना गंडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी अनेक टोळ्या कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून अनोळखी कॉल्सला आपण माहिती देऊ नका, तसेच आपला ओटीपी नंबर कोणालाही शेयर करू नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

एकीकडे रोख व्यवहार टाळत ऑनलाईन व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र अशा घटनांमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे अशा ऑनलाईन  मनी ट्रान्सफर अॅपचा वापर करावा की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधीत बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
Amravati Crime News : अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला
अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget