PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. ही गोष्ट आहे साधारण मे महिन्यातली... मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीये... सहा महिन्यात प्रति तोळा ३० हजारांनी सोन्याच्या किमती कमी झाल्यायत. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याची ही घसरण सुरू आहे... पाहूयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट....
पंतप्रधानांनी आवाहन केलं त्यावेळी सोन्याचा दर १ लाख ५२ हजार रुपये प्रति तोळा होता.
आज या दरात २० टक्क्य़ांची घट झालीय.
आता सध्या भारतात सोनं तोळ्यामागे १ लाख २२ हजार रुपये आहे.
याचा अर्थ त्यात ३० हजार रुपयांची घट झालीय.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सोन्याची खरेदी कमी होऊन दर कमी झालं, असं सांगितलं जात असलं तरी जागतिक स्थितीसुद्धा आता बदलली आहे.
युद्धाचं संकट दूर झालंय.
कच्च्या तेलाचे दर कमी झालेत.
आणि यामुळेच खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारातच सोने दरात घसरण झालीय.
All Shows































