एक्स्प्लोर

Cyber Crime: ऑनलाईन व्यवहार करताना सावधान! लुटारु 'अशा' प्रकारे करतात लोकांची ऑनलाईन फसवणूक

Online Fraud: भारतात ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध टोळ्या या लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी सक्रिय असतात. जाणून घेऊया त्यांच्या विविध पद्धती.

Online Fraud : लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या भारतभर सक्रिय आहेत, त्यांच्यामार्फत देशभरातील लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक केली जाते. काहीवेळा बनावट ऑनलाईन शॉपिंग साईट्स बनवून लोकांचे पैसे लुटले जातात. ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) नवनवीन प्रकार या टोळ्या आत्मसात करत असतात, अगदी सहजपणे लोकांना या टोळ्या त्यांच्या विळख्यात अडकवतात. ओटीपीची मागणी करुन, बँक डिटेल्स मागून खात्यातले सर्व पैसे गायब करण्याचं काम या लुटारु टोळ्या करत असतात.

चांगला जॉब लावून देऊ, घरबसल्या कामाची संधी प्राप्त करुन देऊ असं सांगत लोकांना अगदी सहजपणे फसवलं जातं. हे सर्व काम करत असताना या टोळ्या अधिक खबरदारी घेतात आणि त्यामुळेच आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तुम्ही पोलिसात गेलात, तरी पोलीस देखील आरोपींना पकडण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे, अशा प्रकारांना बळी न पडण्यासाठी नेहमी खबरदारी घेणं आवश्यक आहे, त्यासाठी काही ऑनलाईन फ्रॉडबाबत वेळीच जागरुक होऊया.

ऑनलाईन फसवणूक करण्याच्या विविध पद्धती

1. बँकेतून बोलत असल्याचं भासवून ओटीपीची मागणी

बऱ्याचदा आपल्या फोनवर बँकेतून कॉल येतात. बऱ्याचदा या कॉलमागे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्याच असतात. बँकेतून बोलत असल्याचं भासवून आणि बँकेसारखे खोटे मॅसेज पाठवून ही टोळी ग्राहकांकडे ओटीपी मागते. ओटीपी प्राप्त करुन ग्राहकांच्या बँक अकाऊंटमधील पैसे लुटले जातात. काहीवेळा ग्राहकांना मेसेजमधून एक लिंक पाठवली जाते आणि त्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं जातं. लिंकवर क्लिक केल्यास आपोआप बँकेतील पैसै कट होतात.

2. एनी डेस्कसारखे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक

काहीवेळा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या लोकांशी प्रथम फोनद्वारे संपर्क साधला जातो. एनी डेस्कसारखं अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं जातं, ज्याद्वारे या आरोपींना तुमच्या फोनमधील सर्व तपशील मिळतो. अशा वेळी त्यांना ओटीपी मागण्याची गरज देखील पडत नाही, कारण त्यांनी सांगितलेलं अ‍ॅप तुम्ही डाऊनलोड केलं असतं, ज्याद्वारे तुमच्या फोनचा सर्व तपशील त्यांना दिसतो. अगदी फोनवर आलेला ओटीपी देखील ते पाहू शकतात.

3. बनावट ऑनलाईन खरेदीच्या साईट बनवून गंडा

काही वेळा ही गँग ऑनलाईन खरेदीच्या साईटद्वारे लोकांची फसवणूक करते. कपडे किंवा इतर वस्तू खरेदीसाठी बनावट साईट बनवल्या जातात, ज्यांची जाहिरात आपल्याला सोशल मीडियावर नेहमी दिसत राहते आणि कधीतरी वस्तूंना मोहून जाऊन आपण त्या खरेदी करायचा विचार करतो. वस्तू कार्टमध्ये अ‍ॅड करुन आपण त्या वस्तूंसाठी ऑनलाईन पेमेंट करतो, त्यानंतर ही रक्कम लुटारुंच्या खात्यात जमा होते. यानंतर आपण ऑर्डर केलेल्या वस्तू आपल्याला मिळत नाही किंवा काहीवेळा 30-40 रुपयांच्या वस्तू पाठवल्या जातात. यानंतर ऑनलाईन तक्रार करण्याचा विचार केल्यास या साईट बनावट असल्याने तो पर्याय देखील उरत नाही.

4. क्रिप्टोकरन्सीच्या नावाने लूट

काहीवेळा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करुन पैसे डबल करुन देतो, असं सांगत फसवणूक केली जाते. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डचा नंबर, पासवर्ड, ओटीपी मागून बँक खात्यातील रक्कम लुटली जाते.

5. घरबसल्या काम करण्याची संधी देत असल्याचं सांगत लूट

काहीवेळा हे लुटारु लोकांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामवर मेसेज करतात आणि घरबसल्या काम करण्याची संधी (Work From Home) उपलब्ध करुन देत आहोत, असं ते सांगतात. लोकांना कामाबद्दल माहिती सांगितली जाते. एखाद्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे, व्हिडीओ लाईक करणे अशी कामं सांगितली जातात. यानंतर प्रत्येक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर 50 रुपये देणार असल्याचं ते सांगतात. काहीवेळा फूड अ‍ॅपला फीडबॅक देणे, तर काहीवेळा विविध अ‍ॅप्सला स्टार रेटिंग देणे, अशी कामं सांगितली जातात.

जर तुम्ही ही कामं करण्यास सहमती दर्शवली तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं जातं आणि तुमच्याकडून बँक डिटेल्स मागितले जातात. सुरुवातीला तुमच्या अकाऊंटमध्ये 3 चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मोबदला म्हणून 150 रुपये टाकले जातात. परंतु, नंतर एक असे टास्क दिले जाते, ज्यात तुम्हाला पैसे टाकायला सांगितले जातात. या रकमेचा 30 टक्के नफा मिळेल, असं सांगितलं जातं. (उदा. 1000 रुपये दिल्यास 1,300 रुपये मोबदला) सुरुवातीला या लुटारुंनी तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला म्हणून 150-300 रुपये दिलेले असतात. यातून त्यांनी तुमचा विश्वास जिंकलेला असतो आणि त्यामुळे पैशाच्या आहारी जाऊन जास्त मोबदला मिळेल या आशेने काहीवेळा लोक हजार ते 10 हजार अशी विविध रक्कम लुटारुंच्या अकाऊंटमध्ये वर्ग करतात. एकदा ठराविक रक्कम मिळवली की त्यानंतर या रकमेचा मोबदला मिळणं तर दूर, पण तुम्हाला विशिष्ट टेलिग्राम ग्रुपवरुन देखील काढलं जातं आणि तुम्हाला ब्लॉक केलं जातं.

हेही वाचा:

Jamtara Online Fraud: बाप तुरुंगात गेल्यावर मुलगा घेतो ऑनलाईन फ्रॉडची जबाबदारी; 'जामतारा गँग'ची कहाणी, ज्यांच्यासमोर आयटी इंजिनीअरही फेल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget