ऑनलाईन परीक्षांचा भावी वकिलांना जॅकपॉट! ATKT विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी मार्क्स
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बहुपर्यायी प्रश्नांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जॅकपॉट लागले आहेत.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बहुपर्यायी प्रश्नांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जॅकपॉट लागले आहेत. विधीच्या यावर्षीच्या निकालाचा आलेखही यंदा भलताच उंचावला असून एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. मात्र यामुळे अनेक शिक्षण तज्ञ, प्राचार्यांनी, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतची चिंता वाटत आहे.
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाउनमुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. ऑनलाईन परीक्षेमुळे तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुणांचा चक्क जॅकपॉट लागला आहे. तीन वर्ष विद्या अभ्यासक्रमाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. आतापर्यंत विधीचा निकाल हा 45 ते 50 टक्केपर्यंत लागत होता. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के पर्यंत गुण मिळत होते. मात्र यावेळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या बहुपर्यायी परीक्षेत विद्यार्थ्यांनी चक्क पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.
कोणत्या महाविद्यालयात किती गुणवान
गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये 297 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्या खालोखाल प्रविण गांधी कॉलेज ऑफ लॉ मध्ये 62 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. श्री जयंतीलाल पटेल लॉ कॉलेजमध्ये 49 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. डॉक्टर डी वाय पाटील लॉ कॉलेज मध्ये 48 अस्मिता लॉ कॉलेजमध्ये 43 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. किर लाॅ कॉलेजमध्ये 31 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. एडवोकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ मध्ये 24 आणि हरीया लाॅकाॅलेजच्या 23 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
यंदा बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे शिक्षकाकडून सांगण्यात येत आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI