(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशात पुन्हा एकदा कांद्याचा वांदा, व्यापाऱ्यांकडून सरकारची कोंडी
कांदा साठेबाजीवर सरकारी निर्बंध लावल्याने व्यापारी आक्रमक झाले असून लिलाव ठप्प झाला आहे. यामध्ये बळीराजा मात्र नाहक भरडला जातोय.
नाशिक : नाशिक जिल्हयासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा वांदा झाला आहे. मागील आठवड्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तर आता कांद्याचे लिलावच ठप्प झालेत. कांद्याची साठेबाजी होऊ नये व्यापऱ्याकडील कांदा बजारत यावा कांद्याचा तुटवडा कमी होऊंन शंभरीच्या उंबरठ्यावर गेलेले भाव कमी व्हावेत यासाठी केंद्र सरकारने कांदा साठेबाजीवर निर्बंध लावले. होलसेल व्यापऱ्यानी 25 टनापेक्षा जास्त तर किरकोळ व्यापऱ्यानी 2 टनापेक्षा जास्त कांद्याची साठेबाजी करू नये असा निर्णय सरकारने घेतला आणि जिल्ह्यातील कांदा लिलावाच ठप्प झालेत. यात बळीराजा मात्र नाहक भरडला जातोय.
रोज जिथे हजारो क्विंटल कांद्याचे लिलाव होतात. लाखों रुपयांची उलाढाल होते. त्याच कृषि उत्पन्न बाजार समितिमध्ये शुकशुकाट बघयला मिळतोय. केंद्र सरकारने व्यापऱ्यांवर निर्बंध लावलेत आणि व्यापऱ्यानी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. लिलाव बंद नाहीत मात्र लिलावात सहभागी झाले तर कांद्याचा साठा वाढेल आणि सरकारी कारवाईला सामोर जाव लागेल असा म्हणून लिलावात सहभागी होत नसल्याच स्पष्टीकरण व्यापारी देत आहे.
एकदा कांदा खरेदी केल्यानंतर त्याची वर्गावारी करणे, पॅकिंग करून मुंबई, गुजरात, मध्यप्रदेशसह इतर बाजारपेठेत जाण्यासाठी दोन तीन दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे साठवणूक करावीच लागते मात्र 25 टन ही मर्यादा खूपच कमी असल्यान सर्व व्यापऱ्यानी एकी दाखवीत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारचा निर्णय आणि व्यापऱ्यांच्या आडमुठे भूमिकेमुळे शेतकरी भरडला जातोय. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत जिथे दररोज साधारणपणे 20 हजार क्विंटल कांद्याची प्रतिदिन उलाढाल होत असते.जिल्ह्यातील 13 मुख्य बाजार समितीचा विचार केला तर हाच आकडा 8 टन पर्यंत जातो मात्र ही सर्व उलाढाल ठप्प झाल्यान शेतकरी अडचणीत आलाय. व्यापारी माल घेतच नसल्यान शेतातील कांद्याच करायच काय असा सवाल शेतकरी उपस्थित करतोय.
केंद्र सरकरच्या निर्णयाचा आधार घेत सरकारची कोंडी करण्याची रणनीती व्यापाऱ्यांनी आखली आहे. मात्र कांद्याचा वांदा होण्यात केवळ ही एकमेव कारण नाहीतर अतिवृष्टी देखील आहे. परतीच्या पावसाने दक्षिणेसह महराष्ट्रातील कांदा चाळीतील आणि शेतातील कांद्याचे मोठे नुकसान झालेय. कांद्याचे चक्रच बिघडले कांद्याच्या तुटवडा निर्माण झाल्यान मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाहीये.
देशात सर्वात आधी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून कांदा येतो. ऑगस्ट महिन्यापसून हा कांदा बाजारात येण्यास सुरवात होते. 5 सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील पुणे सोलापूर या भागातील कांदा येतो आणि 15 ऑक्टोबरनंतर नाशिक जिल्हातील कांदा बाजारपेठेत येण्यास सुरवात होते. एका पाठोपाठ एक कांदा बाजारत येत असल्यान त्याचा तुटवडा जाणवत नाही. मात्र यंदा परतीच्या पावसाने तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये धुमाकूळ घातला. पुणे सोलापूरसह नाशिकच्या कांद्याल झोडपून काढल्यान कुठे 40 तर कुठे 50 टक्के कांद्याचे नुकसान झाले असून नवीन कांदा बाजारात येणायस विलंब लागतोय. पुढे कांदा कमी पडू नये साठेबाजी होऊ नये म्हणून सरकारने निर्बंध लादले. व्यापऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे हा निर्णय सरकारवरच उलटला यातून काय आणि कधी तोडगा निघतो ही बघण महत्वाचे आहे.