एक्स्प्लोर
अजिंक्यताऱ्याच्या दरीत पडलेल्यांना वाचवायला गेलेले पोलिसही अडकले
दोन दिवसांपासून दरीत अडकलेल्या व्यक्तीसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात महाबळेश्वरच्या ट्रेकर्सना यश आलं आहे.
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेले दोन पोलीस कर्मचारीही दरीत अडकले. दोन दिवसांपासून दरीत अडकलेल्या व्यक्तीसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात महाबळेश्वरच्या ट्रेकर्सना यश आलं आहे.
शनिवारी सायंकाळी कोडोली येथील संभाजी जाधव हे अजिंक्यताऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. अजिंक्यताऱ्याच्या पाठीमागील दरीत पाय घसरून ते खाली पडले. शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी ओरडायला सुरुवात केली, मात्र त्या भागात कुणीही आलं नाही.
अखेर काल रात्री काही युवक गडावर असताना त्यांनी आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. दोन पोलीस कर्मचारी शोध घेत जखमीपर्यंत पोहोचले, मात्र त्यांनाही खाली उतरता येत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना बोलावलं.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते पहाटे अजिंक्यताऱ्यावर पोहोचले आणि त्यांनी जखमी संभाजींसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही दरीतून बाहेर काढलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement