एक्स्प्लोर

23 February In History : संत गाडगे महाराज यांची जयंती, मधुबाला स्मृतिदिन; आज इतिहासात...

On This Day In History : स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांची आज जयंती आहे.

On This Day In History : स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांची आज जयंती आहे. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला होता. डेबूजी झिंगारजी जानोरकर असे त्यांचे नाव होते. गाडगेबाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोषाख त्यांचा असायचा. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे केली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची भावना होती. लोकांनी त्यांना संत समजून त्यांच्याविषयी भक्ति बाळगली. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.

1616 : विल्यम शेक्सपियर पुण्यतिथी (William Shakespeare Death Anniversary) 

विल्यम शेक्सपियर हे 16 व्या शतकातील इंग्रजी कवी, नाटककार आणि अभिनेते होते.  शेक्सपियर हे इंग्रजी भाषेतील महान लेखक आणि जगातील प्रख्यात नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांनी 38 नाटके, 154 सॉनेट, 2 दीर्घ कथा कविता आणि इतर काही श्लोक लिहिले. त्यांची नाटके प्रत्येक भाषेत अनुवादित झाली आहेत आणि त्यांची नाटके इतर नाटककारांच्या नाटकांपेक्षा जास्त वेळा सादर झाली आहेत आणि आजही होत आहेत. 

1969 :  अभिनेत्री मधुबाला स्मृतिदिन (Madhubala Death Anniversary)

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जन्मलेली मधुबाला आपल्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. आज मधुबालाची पुण्यतिथी आहे. मधुबालाने 1947 मध्ये 'नीलकमल' या नाटकाद्वारे अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. यानंतर तिने 'दिल की रानी' आणि 'अमर प्रेम'मध्येही काम केले. मधुबालाने मुगल-ए-आजम चित्रपटात अनारकलीची भूमिका साकारली होती. मधुबालाची धाकटी बहीण मधुर भूषण उर्फ ​​जाहिदा हिने सांगितले होते की, तिला आयुष्यभर खरे प्रेम मिळावे ही इच्छा होती. मधुबालाची केवळ दिलीप कुमारनेच नव्हे तर किशोर कुमारनेही फसवणूक केल्याचा दावा तिने केला. दिलीप कुमार आणि मधुबाला यांची एंगेजमेंट झाल्याचं बोललं जातं. त्यावेळी एका चित्रपटाबाबत दोघांमध्ये वाद झाला आणि हे नाते तुटले. यानंतर संतापलेल्या मधुबालाने किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं, असं बोललं जातं. 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या 36 व्या वर्षी तिचे निधन झाले.

2004: विजय आनंद यांची पुण्यतिथी (vijay anand  Death Anniversary)

बॉलिवूड अभिनेता, पटकथा लेखक, संपादक, निर्माता आणि दिग्दर्शक विजय आनंद यांची आज पुण्यतिथी आहे. विजय आनंद यांनी 70-80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. विजय यांना गोल्डी आनंद या नावानेही ओळखले जाते. ते त्यांच्या तीन भावांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचे दोन मोठे भाऊ दिग्दर्शक-निर्माता चेतन आनंद आणि अभिनेता-दिग्दर्शक देव आनंद होते. या तिन्ही भावांनी मिळून 'नवकेतन फिल्म्स' सुरू केली. हे एक प्रोडक्शन हाऊस होते. विजय आनंद यांचा जन्म 22 जानेवारी 1934 रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे झाला. विजय आनंद यांनी 'काला बाजार', 'तेरे घर के सामने', 'गाइड', 'ज्वेल थीफ', 'जॉनी मेरा नाम', 'तेरे मेरे सपने' आणि 'कोरा कागज' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. 

1952: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा संमत झाला.

1965: अशोक कामटे जन्मदिन – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर 

1969: प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार वृंदावनलाल वर्मा यांची पुण्यतिथी 

1998: क्रिकेटपटू रमण लांबा यांची पुण्यतिथी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Astrology : महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
Embed widget