एक्स्प्लोर

विक्षिप्त 'तुघलकी कारभारा'साठी ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद बिन तुघलकाचं निधन, 88 वर्षानंतर अमेरिका-क्युबा संबंधांना नवा आयाम; आज इतिहासात

On This Day In History : तब्बल 88 वर्षानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने क्युबाला भेट दिली आणि या दोन देशांदरम्यान बंद पडलेल्या संबंधांना पुन्हा चालना मिळाली. 

20 March In History: आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण 20 मार्च रोजी आपल्या विक्षिप्त कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद बिन तुघलकाचं निधन झालं होतं. तसेच आजच्याच दिवशी शहाजहानचा मोठा मुलगा आणि औरंगजेबचा भाऊ दारा शुकोह याचा जन्मही झाला होता. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 20 मार्च या तारखेला नोंदवलेल्या प्रमुख घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे,

1351: मोहम्मद बिन तुघलक शाह याचे सुरत येथे निधन

मोहम्मद बिन तुघलक (Muhammad bin Tughluq) हा दिल्ली सल्तनतमधील तुघलक वंशाचा शासक होता. घियासुद्दीन तुघलकाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा 'जुना खान' हा मोहम्मद बिन तुघलक या नावाने दिल्लीच्या गादीवर बसला. मोहम्मद तुघलक याला राजमुंद्रीच्या शिलालेखात जगाचा खान म्हटलं गेलं आहे. मध्ययुगीन काळातील सर्व सुलतानांमध्ये मोहम्मद तुघलक हा सर्वात शिक्षित, विद्वान आणि सक्षम व्यक्ती होता. 

मोहम्मद बिन तुघलक त्याच्या विक्षिप्त निर्णयामुळे ओळखला जायचा. त्याने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा उल्लेख आजही केला जातो. त्या विक्षिप्त निर्णयांच्या सक्तीच्या अंमलबजावणीमुळे 'तुघलकी फरमान' किंवा 'तुलघकी कारभार' हा वाक्प्रचार प्रसिद्ध झाला आहे. मोहम्मद बिन तुघलकने अचानक आपली राजधानी दिल्लीहून महाराष्ट्रातील देवगिरी येथे हलवण्याचा निर्णय घेतला. ज्याचे नाव त्याने दौलताबाद ठेवले. त्यानंतर त्याने दिल्लीतील लोकांना दौलताबादला जाण्यास भाग पाडले. त्यापैकी अनेकांचा वाटेतच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. दौलताबाद हा रखरखीत प्रदेश होता, जिथे त्याला पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागला आणि अखेरीस राजधानी पुन्हा दिल्लीला हलवावी लागली.

चांदीच्या नाण्याऐवजी तांब्याचे नाणे सुरू करण्याचा त्याचा आणखी एक विक्षिप्त निर्णय. त्यामुळे दिल्लीतील लोकांनी घराघरात तांब्याची नाणी पाडायला सुरुवात केली. त्याने काढलेली तांब्याची नाणी चांगल्या दर्जाची नसल्यामुळे लोकांनी त्यांची नक्कल करून घरोघरी टांकसाळ टाकायला सुरुवात केली आणि त्यातून जिझिया (कर) भरायला सुरुवात केली. त्यामुळे एकंदरीत त्यांचा हा निर्णयही चुकीचा ठरला आणि त्यामुळे महसुलाचे मोठे नुकसान झाले आणि मग तो तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी करातही मोठी वाढ केली. अशा या तुघलकाचा मृत्यू 20 मार्च 1351 रोजी झाला. 

1602: नेदरलँड्सच्या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

1615: शहाजहानचा मुलगा दारा शिकोह याचा जन्म

मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज महल यांचा मोठा मुलगा दारा शिकोह (Dara Shikoh) याचा जन्म 20 मार्च 1615 रोजी झाला. दाराला 1633 मध्ये युवराज बनवण्यात आले. तो 1645 मध्ये अलाहाबाद, 1647 मध्ये लाहोर आणि 1649 मध्ये गुजरातचा शासक बनला. 1653 मध्ये कंदाहार येथे झालेल्या पराभवामुळे त्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. तरीही शाहजहानने त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून त्याची निवड केली. शाहजहान आजारी पडल्यावर औरंगजेब आणि मुराद यांनी दारा काफिर असल्याचं सांगत त्याच्याविरोधात लढाई केली. त्यामध्ये दारा पराभूत झाला. शेवटी 10 सप्टेंबर 1659 रोजी औरंगजेबाने त्याची दिल्लीत हत्या केली.

सूफीवाद असलेला दाराने सर्व हिंदू आणि मुस्लिम संतांचा आदर केला. त्याने अनेक साहित्याच्या लिखानात आपलं योगदान दिलं आहे. त्याने हिंदू उपनिषदांचे भाषांतर केलं. हिंदू तत्त्वज्ञान आणि पौराणिक कथांशी त्यांचा संपर्काचा परिचय त्यांच्या अनेक रचनांमध्ये आढळतो. दाराचा असा विश्वास होता की वेदात आणि इस्लाममध्ये सत्यासंबंधी एकच संदेश देण्यात आला आहे. इस्लाम आणि वेदांत या दोन धर्मांच्या एकत्रीकरणासाठी दाराचे उपनिषदांचे भाषांतर महत्त्वाचे योगदान आहे.

1739: नादिरशाहने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली

नादिर शाह अफशर (Nader Shah) हा पर्शियाचा शाह होता. त्याने आपले जीवन गुलाम म्हणून सुरू केले आणि तो केवळ पर्शियाचा शाह बनला नाही, तर त्याने त्या वेळी रशियन साम्राज्याला इराणच्या प्रदेशातून बाहेर काढले. त्याने अफशरी राजवंशाची स्थापना केली आणि त्याचा उदय अशा वेळी झाला जेव्हा इराणवर अटोमन साम्राज्याचे पश्चिमेकडून आक्रमण होते आणि पूर्वेकडून अफगाणांनी सफविद राजधानी इस्फहान काबीज केलं होतं. उत्तरेकडून रशियाने पर्शियामध्येही आपले साम्राज्य वाढवण्याची योजना आखली होती. या परिस्थितीतही त्याने आपले सैन्य संघटित केले आणि त्याच्या लष्करी मोहिमांमुळे त्याला पर्शियाचा नेपोलियन किंवा आशियाचा शेवटचा महान सेनापती अशा पदव्या देऊन सन्मानित केलं जातं.

20 मार्च 1739 रोजी त्याने दिल्लीत सत्तेवर असलेल्या मुघल सम्राट मुहम्मद शाह आलमला पराभूत केलं आणि त्या ठिकाणाहून अमाप संपत्तीची लूट मिळवली. त्यामध्ये कोहिनूर हिराही होता. 1747 मध्ये त्याच्या हत्येनंतर, त्याचे साम्राज्य लवकरच विघटित झाले.

1800: अॅलेसॅन्ड्रो व्होल्टाने इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध लावला

आधुनिक जीवनाची बॅटरीशिवाय कल्पना करणे शक्य नाही. दैनंदिन कामात वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरीचा वापर केला जातो. बॅटरीशी संबंधित इतिहासाबद्दल बोलताना महान इटालियन शास्त्रज्ञ अलेसेंड्रो व्होल्टा (Alessandro Volta) याने 20 मार्च 1800 रोजी बॅटरीच्या शोध लागल्याचं जाहीर केलं. दोन काचेच्या भांड्यांमध्ये तांबे आणि झिंक रॉड ठेवून आणि त्यांना मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या वायरने जोडले आणि या भौतिक पद्धतीने वीज निर्माण करता येते हे व्होल्टाने सिद्ध केले.

1916: अल्बर्ट आइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताचे प्रकाशन

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन (Albert Einstein) यांनी 20 मार्च 1916 रोजी सापेक्षतावाद सिद्धांताचे (The theory of relativity)प्रकाशन केलं. आइनस्टाईन यांना फोटोइलेक्ट्रीक इफेक्टसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 1999 मध्ये टाईम मासिकाने त्यांना द पर्सन ऑफ द सेंच्यूरी (The Person Of The Century)  म्हणून गौरवण्यात आलं आहे. आइन्स्टाईन यांनी 300 हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. 5 डिसेंबर 2014 रोजी, विद्यापीठे आणि संग्रहणांनी 30,000 हून अधिक अद्वितीय आइन्स्टाईन डॉक्युमेंट्स आणि लेटर्स प्रदर्शित करण्याची घोषणा केली. आइन्स्टाईन यांच्या बौद्धिक कर्तृत्वाने आणि वेगळेपणामुळे 'आइन्स्टाईन' हा शब्द 'बुद्धिमान' असा समानार्थी बनला आहे.

2006: ओसामा बिन लादेन पाकिस्तानात असल्याचा दावा अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

2014: लेखक पत्रकार खुशवंत सिंग यांचे निधन

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंह (Khushwant Singh) यांचे 20 मार्च 2014 रोजी निधन झाले. खुशवंत सिंग हे भारतातील प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार होते. पत्रकार म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. पारंपारिक पद्धती सोडून त्यांनी नव्या पद्धतीने पत्रकारिता सुरू केली. त्यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातही काम केले. ते 1980 ते 1986 या काळात राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. खुशवंत सिंग जितके भारतात लोकप्रिय होते तितकेच ते पाकिस्तानातही होते. त्यांचे 'ट्रेन टू पाकिस्तान' हे पुस्तक खूप गाजले. यावर एक चित्रपटही तयार झाला आहे. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एका जिंदादिल व्यक्तीप्रमाणे पूर्ण मेहनतीने जगले.

2016: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची ऐतिहासिक क्युबा भेट

20 मार्च 2016 हा दिवस अमेरिका आणि क्युबाच्या संबंधामध्ये (US Cuba Relation) एक ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा दिवस ठरला. याच दिवशी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांनी क्युबाला भेट दिली. तब्बल 88 वर्षानंतर एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने त्या देशाला भेट दिली होती. त्या आधी 1928 साली त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष केल्विन कुलिज यांनी क्युबाला भेट दिली होती. 

1960 च्या दशकात अमेरिका आणि क्युबा या दोन देशादरम्यानचे संबंध बिघडले. 1959 मध्ये कम्युनिस्ट क्रांतीनंतर अमेरिकेने क्युबावर बंदी घातली. या बंदीमुळे अमेरिकेला दरवर्षी 1.2 बिलियन डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. 2014 मध्ये ओबामा यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध सुधारण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये अमेरिकेने क्युबामध्ये आपला दूतावास पुन्हा सुरू केला. सप्टेंबर 2015 मध्ये, क्युबाने अमेरिकेत आपला दूतावास पुन्हा सुरू केला.

महान क्रांतिकारक चे गव्हेरा (Che Guevara) याच्या नेतृत्वाखाली 1959 साली क्युबामध्ये साम्यवादी क्रांती झाली. त्यानंतर 1967 साली बोलिव्हिया या देशात चे गव्हेराची हत्या करण्यात आली. ही हत्या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होती. त्यानंतर या दोन्ही देशांदरम्यानचं संबंध बिघडलं होतं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
Pune Navale bridge: नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी

व्हिडीओ

Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
Pune Navale bridge: नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
Raj Thackeray and Sayaji Shinde: तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
Ind vs SA 1st T20 Team India Playing XI: 7 खेळाडू OUT, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
7 खेळाडू OUT, सूर्यकुमार-शुभमन IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Home Loan Interest rate: होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेपो रेट कमी होताच 'या' 4 बँकांनी व्याजदर घटवला
होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेपो रेट कमी होताच 'या' 4 बँकांनी व्याजदर घटवला
Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner Instagram Post: 'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19' जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
Embed widget