एक्स्प्लोर

15 December In History: 1971 च्या युद्धात पाकिस्तानचे भारतासमोर लोटांगण आणि निर्भया अत्याचाराची घटना; आज इतिहासात

देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया अत्याचाराची (Nirbhaya Case) घटना 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत घडली होती. या घटनेत निर्भयाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. 

मुंबई: भारतासाठी 16 डिसेंबर हा अभिमानाचा आहे, आजच्याच दिवशी इतिहासात म्हणजे 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आजच्याच दिवशी पाकिस्तानच्या लष्कराने भारतासमोर लोटांगण घातलं आणि बांग्लादेशची निर्मिती झाली. त्याचसोबत आजचा दिवस दुसऱ्या अर्थाने भारतासाठी धक्कादायक ठरला. आजच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले, त्यामध्ये त्या युवतीचा मृत्यू झाला. यासह इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्यावर नजर टाकू. 

1920- चीनच्या कान्सू प्रांतात भूकंप, एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू

चीनमध्ये 16 डिसेंबर 1920 रोजी कान्सू या भागात झालेल्या भूकंपात तब्बल एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. 

1945- जपानचे पंतप्रधान फुमिमारो

दुसऱ्या महायुद्धात जपानने जर्मनीसोबत राहून मित्र राष्ट्रांच्या विरोधात भूमिका घेतली. सुरवातीला जपानने मुसंडी मारत मोठ्या भागावर कब्जा मिळवला. नंतर जर्मनीने शरणागती पत्करली तरीही जपान लढत राहिला. पण अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंबचा हल्ला केला आणि जपानने शरणागती पत्करली. या युद्धामध्ये जपानचे पंतप्रधान फुमिमारो यांना अमेरिकेने युद्ध अपराधी बनवले आणि खटला चालवायचा निर्णय घेतला. त्यावेळी या खटल्याला सामोरं न जाता फुमिमारो यांनी 16 डिसेंबर 1945 रोजी आत्महत्या केली. 

1951- हैदराबादच्या सालारजंग संग्रहालयाची स्थापना 

हैदराबादचे प्रसिद्ध संग्रहालय, सालारजंग संग्रहायलाची 16 डिसेंबर 1951 रोजी स्थापना करण्यात आली. 

1971- पाकिस्तानची भारतासमोर शरणागती

पूर्व पाकिस्तानने म्हणजे आताच्या बांग्लादेशने पश्चिम पाकिस्तानविरोधात बंड केलं आणि स्वतंत्र्या देशाची मागणी केली. त्यानंतर पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर अत्याचार करत त्या देशात हिंसाचाराचा उच्छाद मांडला. यात पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 रोजी भारतावरही हल्ला केला. भारताने या युद्धात (India-Pakistan war)सहभागी होत केवळ 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971. हाच दिवस भारतात 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो.

1985- देशातील पहिली फास्ट ब्रिडर अॅटोमिक रिअॅक्टर कल्पकम कार्यान्वित 

देशातील पहिले फास्ट ब्रिडर अॅटोमिक रिअॅक्टर असलेली कल्पकम अणुभट्टी 16 डिसेंबर 1985 पासून कार्यान्वित झाली. 

2009- 'अवतार' चित्रपट प्रदर्शित 

हॉलिवूडच नव्हे तर जगभरातील चित्रपटसृष्टीवर प्रभाव टाकणारा 'अवतार' हा चित्रपट 16 डिसेंबर 2009 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात कमाईचे सर्व विक्रम मोडत 2.7 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती.

2012- देशाला हादरवणाऱ्या निर्भया अत्याचाराची घटना

आजच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती.  ही घटना निर्भया केस म्हणून ओळखली जाते. निर्भया सिनेमा पाहून झाल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय इतर सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्याला विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.

तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने देश हादरुन गेला.

 2014- पाकिस्तानातील पेशावरमधील शाळेवर दहशतवाद्यांचा हल्ला, 150 जणांचा मृत्यू 

तहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने 16 डिसेंबर 2014 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमधील एका शाळेवर हल्ला केला. त्यामध्ये 150 जणांना आपला जीव गमवावा लागला. या मृतांमध्ये 134 विद्यार्थी होते. सहा दहशतवादी या शाळेत घुसले आणि त्यांनी अंधाधूंद गोळीबार केला. या शाळेत 1500 हून अधिक विद्यार्थी होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Embed widget