एक्स्प्लोर

ओमराजे संतापले, मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणणार; अतिवृष्टी अनुदानावरुन दिल्लीत ठाकरेंच्या खासदाराची डरकाळी

अतिवृष्टी अनुदानावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Omraje Nimbalkar :  अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, अशी माहिती कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती; परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

आधी गृहमंत्रालयाने कृषी मंत्रालयाने लिहून दिलं की अजून प्रस्ताव आलेला नाही. तुमच्या माध्यमातून बातम्या झाल्यानंतर कृषीमंत्री म्हणाले की राज्यकडून प्रस्ताव आलेला आहे. सर्वोच्च सभागृहात त्यांनी असं म्हटलं आहे. हे खासदारांच्या विशेषाधिकारात येतं, त्यामुळं लोकसभा अध्यक्षाकडे दाद मागणार आहे.  
मंत्री खोटं उत्तर देत असतील तर ते दुर्दैवी आहे. दुर्लक्ष झालं असेल तर कबूल करा ना. पण अशाप्रकारे राज्यातील सरकारला प्रोटेक्ट करत आहेत. आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याने असं रेकॉर्डवर खोट उत्तर दिलेलं पाहिलं नाही असे ओमराजे म्हणाले. प्रस्ताव केंद्राकडे येत नाही तर डबल इंजिन चा काय उपयोग? असा टोला देखील ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. 

मुख्यमंत्री फोनवरुन सभा घेत होते, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून पळत पळत जातायेत

मुख्यमंत्री फोनवरुन सभा घेत होते, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून पळत पळत जात सभा घेत आहेत. मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. उद्या किंवा परवा हक्कभंग दाखल करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले.  लोकसभेत दिले जाणारी उत्तरे खोटे ठरवली जाणार असेल तर दुर्दैवी आहे.  

खोटं बोल पण रेटून बोल अशी राणा जगजितसिंह पाटील यांची स्थिती

खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती असल्याचे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली. डबल इंजिन सरकारचा काय उपयोग होतो आहे. तुळजापूरमध्ये ज्याने ड्रग्स आणलं. त्याचे अकाउंट स्टेटमेंट आहेत. तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्रच्या नगराध्यक्ष पदाचा तिकीट भाजपने त्याला दिलं. ज्याला अब्रू नाही त्याने अब्रुनुकसान दावा काय करावा असेही ओमराजे म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

Omraje Nimbalkar : अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारची अनास्था, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडला; तर खासदार ओमराजे निंबाळकरांची सरकारवर सडकून टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला
Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय
Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget