omicron : 13 देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध, राजेश टोपेंची माहिती
Rajesh Tope : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत (omicron variant covid) दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या आहे.
![omicron : 13 देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध, राजेश टोपेंची माहिती omicron variant covid health minister Rajesh Tope aware about international flights and omicron omicron : 13 देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध, राजेश टोपेंची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/1aa1992b46f820b2921212dca07d6a3a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajesh Tope : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत (omicron variant covid) दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 13 देशातून आलेल्या प्रवाशांना आता क्वारंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यांचबरोबर या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य असणार आहे. प्रत्येक आठ दिवसानंतर आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार आहे. तसेच देशाअंतर्गतविमान प्रवास करणाऱ्याना देखील 48 तासांच्या आतील निगेटिव्ह प्रमाणपत्र अवश्यक असणार आहे. दरम्यान जुनकीय बदलाचे निरीक्षण करणाऱ्या लॅब वाढवण्याच्या सूचना देखील या बैठकीत करण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभागाच अधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्स यांची शनिवारी तब्बल दोन तास बैठक झाली. या बैठकीत ओमिक्रॉन या व्हेरिएंटबाबत चर्चा झाली. टास्कफोर्सनं या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत सर्वविस्तर माहिती दिली. धोके आणि उपाययोजना काय कराला हव्यात याबाबत माहिती दिली. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग इतर व्हिरिएंटच्या तुलनेत अधिक वेगानं होतं. दक्षिण आफ्रिकेत डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट आली होती. मात्र आता ओमिक्रॉन व्हेरिएंटनं डेल्टा व्हेरिएंटला पूर्णपणे रिप्लेस करण्याचं काम केलेय. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा पाच पटीने अधिक वेगानं पसरतो. त्यामुळे ओमिक्रॉनचे जवळफास 20 म्युटेशन आहेत. या व्हेरिएंटचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटना करत आहे. या व्हेरिएंटची दाहकता किती आहे? गंभीर रुग्ण किती आहेत? याची लक्षणं काय आहेत? या व्हेरिएंटवर लसीकरणाचा परीणाम होतोय का? हे सर्व तपासण्याचं काम जागतिक आरोग्य संघटना करत आहे. आरटीपीसीआरच्या चाचण्यांमधून या व्हेरिएंटचं निदान होऊ शकते का? हे पडताळून पाहण्याचं काम सुरु आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे सांगितलं. या व्हेरिएंटचा संसर्गदर अतिशय जास्त आहे, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असेही टोपे म्हणाले.
ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबतची सर्व माहिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा सल्ला टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिला. हा व्हेरिएंटच्या संसर्गाची गती डेल्टापेक्षाही जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)