एक्स्प्लोर

Verification of voters : मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, 20 ऑगस्टपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; सहकार्य करण्याचं आवाहन

राज्यात 20 ऑगस्ट 2023 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत.

Verification of voters : राज्यात 20 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी (Verification of voters) करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. 

मतदारांच्या भेटीमध्ये नेमकं काय होणार

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या या भेटींमध्ये मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील. मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील. तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्याचे कामही या काळात केले जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. 

18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी

या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळं जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे. वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत. स्थलांतरीत  झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असेही आवाहन देखील देशपांडे यांनी केलं आहे. 

मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार आहे. त्यामुळं सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. तसेच त्यांना विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले. 

महत्त्वाच्या बातम्या:

ABP C Voter Survey: सोनिया गांधी मिशन 2024 साठी अॅक्शन मोडमध्ये, कोणाचं वाढणार टेन्शन? सर्वेक्षणातून लोकांचा कल समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊसSupriya Sule Vs Atul Benke|माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, हिम्मत असेल तर.. सुळेंची बेनकेंवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget