एक्स्प्लोर

सगेसोयऱ्यांबाबतची अधिसूचना रद्द करा, छगन भुजबळांच्या नेतृत्त्वातील ओबीसींच्या बैठकीत तीन ठराव मंजूर

3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा पार पडणार आहे. तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार अशी छगन भुजबळांनी घोषणा केलीय.  

 मुंबई : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal ) नेतृत्त्वात ओबीसी (OBC) नेत्यांच्या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आलेत. सगेसोयऱ्यांबाबती अधिसूचना रद्द करण्यात यावी, कुणबी दाखले वितरणाला स्थगित द्यावी आणि सुनिल शुक्रे, जाधव यांच्या मागासवर्गीय आयोगावर नियुक्त्या केल्या ह्या चुकीच्या आहेत. शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोग यांची निवड रद्द करावी असा ठराव करण्यात आलाय. 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा पार पडणार आहे. तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार अशी छगन भुजबळांनी घोषणा केलीय.  

 ओबीसी संघटनांच्या बैठकीत राज्य सरकारने सगेसोयरे याची व्याख्या बदलावी अशी मागणी करण्यात आली. सगेसोयरे मसुद्यामुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण असल्याचे भुजबळांनी सांगितले. त्याशिवाय,  सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती असंविधानिक आहे.कुणबी मराठा प्रमाणपत्राला स्थगिती द्यावी अशी मागणीदेखील करण्यात आली. 

फडणवीसांचे भुजबळांना प्रत्युत्तर

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाची अधिसूनचा भुजबळांनी शांतपणे वाचाव्या असा सल्ला एकनाथ शिंदेंनी दिला. ज्याला भुजबळांनी उत्तर दिलंय. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तर ओबीसीला धक्का लावणार नाही असं म्हणता आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणत्र घेवून लाखो मराठा बांधव ओबीसीत सामील होणार असं म्हणत फडणवीसांना भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय  

ओबीसींची महाराष्ट्र यात्रा

 ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढण्यात येणार असून त्याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे. या आंदोलनात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांनीदेखील एकत्र यावं असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.  लाखोच्या संख्येने सर्वांनी बाहेर पडायला हवं. राजकिय नेत्यांना कळायला हवं की आमची त्यांना गरज आहे हे अधोरेखित करण्याची आवश्यकता असल्याचेही भुजबळांनी  म्हटले. 

छगन भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

ओबीसींच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केला आहे. फक्त कुणबी दाखले वितरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्वासत घेतलं मात्र अधिसूचनेबाबत चर्चा झाली नाही असं भुजबळ म्हणालेत. तसंच आता शिवसेना सोडणं सोपं आहे, असं म्हणत शिंदेंना टोलाही लगावलाय.

हे ही वाचा :

Maratha Reservation : राणे, भुजबळांचा थेट विरोध, पटेलांनी हात झटकले; अध्यादेशाने नेमकी कोंडी मराठ्यांची की शिंदे सरकारची होणार?

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget