एक्स्प्लोर

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे परिणाम इतर राज्यांवरही होतील, घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात...

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाचे परिणाम इतर राज्यांवरही होतील.

OBC Reservation : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावणी दरम्यान राज्य सरकारला धक्का दिला. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळताना त्यातील त्रुटींवर बोट ठेवले आहे, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर निवडणुकांबाबत जो पेच निर्माण झालाय, त्याचं विश्लेषण करण्यासाठी एबीपी माझा सोबत बातचीत केली घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी 

आजच्या निकालाला इंपेरिकल डेटाचा मुद्दा कारणीभूत - बापट

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर ओ बी सी आरक्षणाशीवाय निवडणूका या घ्याव्याच लागतील.  निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार देखील त्या थांबवू शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाला इंपेरिकल डेटाचा मुद्दा कारणीभूत असल्याचं बापट म्हणाले.  मागील वेळेस सर्वोच्च न्यायालयाने ओ बी सी आरक्षणासाठी डेटा गोळा करताना को लेट आणि कंटेम्पररी असे दोन महत्वाचे शब्द वापरले होते.  ज्याचा अर्थ होता हा डेटा केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्हींचे निकष पूर्ण करणारा हवा होता आणि कंटेम्पररी म्हणजे तो आजच्या परिस्थितीत लागू होणारा हवा होता.  याबाबतीत राज्य सरकारने सादर केलेला डेटा टिकला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपुर्ण देशासाठी असतो. त्यामुळे या निकालाचे परिणाम इतर राज्यांवरही होतील.

 सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे 

> राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणास नकार
> राज्य मागासवर्गाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नये, राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
> राज्य मागासवर्गाच्या अहवालात त्रुटी असल्याचे सुप्रीम कोर्टाचे मत
 >राज्य मागासवर्गाच्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
> स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाची माहिती अहवालात नव्हती. 
> ओबीसींचे राजकीय प्रतिनिधीत्वाची माहिती योग्यप्रकारे या अहवालात सादर झाली नाही. 
> त्याशिवाय, कोणत्या कालावधीतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
> पुढील निर्देश येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका ओबीसी आरक्षित जागा या खुल्या गटातील गृहीत धराव्यात असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. 
> पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही
> हा निर्णय केवळ महाराष्ट्रच नव्हे देशातल्या सर्व राज्यांसाठी असणार

या आधी सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?

सर्वोच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2021 रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या 105 नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली होती. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेश कोर्टानं दिला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget