एक्स्प्लोर

OBC Reservation : सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; 'त्या' जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर होण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे.

OBC Reservation : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court On OBC Reservation) स्पष्ट केले आहे. या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला कोर्टाची अवमानना केली, असे समजण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

बांठिया आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हेआरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या 50 टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील 27 महापालिकांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन या प्रवर्गामध्ये ओबीसींचा समावेश करुन त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली. 

या निवडणुकांना फटका

राज्य निवडणूक आयोगाने  92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती. 

पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Jogeshwari Crime: विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना
विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
Embed widget