एक्स्प्लोर

भुजबळांच्या सीएलाही अटक, आता पंकजचा शोध?

मुंबईः पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळांच्या अटकेनंतर ईडीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ईडीने भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील नाईक यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली.   याप्रकरणात 29 जणांवर पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप असून, त्यांची झाडाझडती सुरु आहे. या कारवाईदरम्यान, सुनील नाईक यांच्या घरी धाड टाकून त्यांना अटक करण्यात आली.   न्यायालयाने नुकताच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. नाईक यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.   सुनील नाईक यांची महत्वाची भूमिका   नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे सीए होते.  त्यामुळे सुनील नाईक हे समीर आणि छगन भुजबळ यांच्या पैशांच्या अफरातफरी आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानण्यात येतो.   महाराष्ट्र सदन प्रकरणात नाईक हे भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांचे अत्यंत निकटचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मागच्या आठवड्यात विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी पंकज भुजबळ यांच्यासह 28 जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ईडीला दिले होते.   पंकज भुजबळांची शोधाशोध   ईडीने बुधवारी या सर्वांविरोधात शोधमोहिम सुरु केली होती. प्रत्येकाच्या घरी जाऊन ईडीने धाडी टाकल्या. मात्र ईडीला केवळ नाईक यांनाच शोधण्यात यश आलं. पण पंकज भुजबळ ईडीला सापडले नाहीत.   भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना पुतण्या समीर, मुलगा पंकज आणि स्वतः भुजबळ यांनी 2005 मध्ये कोणत्याही टेंडरविना कंत्राटे दिल्याचा आरोप आहे, त्याबाबतही ईडी चौकशी करत आहे.   सुमारे 870 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, हा पैसा नेमका कुणाला मिळाला, याचा ईडी तपास करत आहे.   समीर यांची मुख्य भूमिका?   या संपूर्ण गैरव्यवहारात समीर भुजबळ यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा दावा, ईडीने  कोर्टात केला आहे. मात्र समीर भुजबळ हे याप्रकरणात नाईक यांच्याकडे बोट दाखवत असल्याचंही ईडीने कोर्टात म्हटलं आहे.   गोयंका यांचा अटकपूर्व जामीन दरम्यान याप्रकरणात डीबी रिअलटीचे व्यवस्थापकीय संचालक विनोदकुमार गोयंका यांचाही या 28 जणांच्या आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांनी आपला अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गोयंका यांनी वकिल हर्षदा पोंडा यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी 14 पानी अर्ज दाखल केला आहे. अंतिम सुनावणी होईपर्यंत अजामीनपात्र वॉरंट थांबवावा, अशी मागणी गोयंका यांनी केली आहे.   डीबी रिअलटीने 2008 मध्ये परवेश कंस्ट्रक्शनसह एक जागा विकसित केली होती, असे याचिकेत म्हटले आहे. मात्र, परवेश कंस्ट्रक्शनकडून भूमी संपादनाला होत असलेला उशीर पाहून डीबी रिअलटीने त्यातून काढता पाय घेतला आणि गुंतवलेले 5 कोटी परत देण्याची मागणी केली होती. त्यांना पैसे परत देखील मिळाले होते, असं याचिकेत म्हटलं आहे.  पण यामध्ये मनी लाँडरींग कायद्याचं उल्लघन होईल असं काहीही नव्हतं असं, याचिकेत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget